शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:30 IST

मानोरी : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण, दाट धुके पडत आहे. ...

मानोरी : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण, दाट धुके पडत आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास तुरळक अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्यानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, लाल कांदा लागवड, द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याच्या भीतीने सातत्याने औषध फवारणी करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड, जळगाव नेउर, शिरसगाव, पिंपळगाव लेप, जऊळके आदी परिसरात मुसळधार पावसामुळे रोपांचे अतोनात नुकसान झाल्यानंतर नव्याने रोपे विकत घेऊन उशिरा उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी व्यस्त आहे. मात्र, ही नव्याने केलेली कांदा लागवड ढगाळ वातावरण आणि दाट धुक्याच्या कचाट्यात सापडली आहे. कांद्याचे शेंडे पिवळसर पडण्याच्या भीतीने शेतकरी वर्गाकडून औषध फवारणी केली जात असून, याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

दरम्यान, या ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर द्राक्ष उत्पादक शेतकरी देखील पूर्णतः धास्तावला असून, मोठ्या मेहनतीने घेतलेल्या द्राक्षबागेला काही दिवसांपूर्वी चांगल्या प्रकारे फळे लागली आहेत. वातावरणातील बदलामुळे सातत्याने औषध फवारणी करून द्राक्षबाग जगवलेली असताना आता चांगल्या प्रकारे फळे लागली आहेत. तुरळक पडणाऱ्या अवकाळी पावसाने आणि पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे द्राक्षफळावर हे पाणी साचून काळे डाग पडत असून. यातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. द्राक्षामधून वर्षातून एकदाच चांगल्या प्रकारे शेतकरी उत्पादन घेत असतात. वर्षाकाठी लाखो रुपये खर्चून द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाच्या सरींनी मागील तीन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून, या हवामान बदलाचा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

-----------------

मागील तीन दिवसांच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्षावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, खराब वातावरणामुळे दररोज औषध फवारणी करावी लागत आहे. पुढचे काही दिवस वातावरण ढगाळ असल्याने द्राक्षबागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका देखील बसणार आहे.

- कल्याण कोटकर, द्राक्ष उत्पादक, शिरसगाव लौकी.