शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डझनभर नगरसेवक निवडणूक मैदानातून ‘आउट

By admin | Updated: November 5, 2016 00:43 IST

’सिन्नर : १३ नगरसेवक पुन्हा आजमवणार ‘नशीब’; थेट नगराध्यक्षाच्या आखाड्यात एक विद्यमान नगरसेवक

शैलेश कर्पे ल्ल सिन्नरजिल्ह्यातील सर्वात जुनी पालिका असलेल्या व भव्यदिव्य इमारत असलेल्या सिन्नर नगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून पाय ठेवण्यासाठी तेरा विद्यमान नगरसेवक सरसावले आहेत, तर डझनभर विद्यमान नगरसेवकांनी घरी बसणे पसंत केले आहे. बारा विद्यमान नगरसेवकांना या ना त्या कारणाने निवडणूक रिंगणातून बाहेर राहावे लागले आहे. काही विद्यमान नगरसेवकांनी स्वखुशीने थांबणे पसंत केले आहे तर काहींना आरक्षण अन् प्रभागरचनेचा फटका बसला आहे. काही विद्यमान नगरसेवकांना जनता नाकारेल या धास्तीने नेत्यांनी पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २३ नगरसेवक जनतेतून निवडून आले होते, तर दोन नगरसेवक स्वीकृत होते. त्यामुळे गेल्यावेळी पालिकेच्या सभागृहातील नगरसेवकांची संख्या २५ होती. यावेळी प्रभागरचना बदलली असून, १४ प्रभागांतून २८ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत, तर तीन नगरसेवक स्वीकृत असणार आहेत. त्यामुळे यावेळी पालिकेच्या सभागृहात ३१ नगरसेवक असणार आहेत. २८ लोकनियुक्त नगरसेवक संख्या असलेल्या पालिकेच्या निवडणुकीत यंदा अनेक बदल पाहावयास मिळणार आहेत. प्रभागरचना अन् आरक्षणामुळे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकपद भूषविणाऱ्या नगरसेवकांना याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या वेळचे २५ पैकी १२ नगरसेवक कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणुकीपासून लांब राहिले आहेत, तर उर्वरित १३ नगरसेवक पुन्हा आखाड्यात उतरले आहेत. त्यातील विद्यमान नगरसेवक लता मनोहर हिले यांनी थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला आहे. कॉँग्रेस पक्षाकडून त्यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. विद्यमान नगराध्यक्ष आश्विनी देशमुख व उपनगराध्यक्ष संजय नवसे हे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात नसले तरी पालिका निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय आहेत. उपनगराध्यक्ष संजय नवसे यांची सून राधिका रोशन नवसे निवडणूक रिंगणात आहेत.सिन्नरचे राजकारण पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठ आहे. आमदार राजाभाऊ वाजे शिवसेनचे आमदार आहेत, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे भाजपाचे नेते आहेत. पक्षांपेक्षा वाजे गट किंवा कोकाटे समर्थक या नावानेच राजकारण तापते. आमदार वाजे यांनी शैलेश नाईक, विजया बर्डे व प्रमोद चोथवे या विद्यमान नगरसेवकांना शिवसेनेच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवले आहे, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विठ्ठल उगले, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नामदेव लोंढे, नगरसेवक शीतल कानडी, उज्ज्वला खालकर, मल्लू पाबळे, बापू गोजरे या सहा विद्यमान नगरसेवकांना भाजपाकडून उमेदवारी दिली आहे. मेहमूद दारूवाले, लता मुंडे या दोघा विद्यमान नगरसेवकांनी कॉँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा नशीब अजमावण्याचा निर्णय घेतला आहे. कॉँग्रेसच्या विद्यमान नगरसेवक लता हिले या काँग्रेस पक्षाकडून थेट नगराध्यक्ष पदाच्या मैदानात उतरल्या आहेत. स्वीकृत नगरसेवक हर्षद देशमुख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उडी घेतली आहे. शिवसेनेने २५ नवीन चेहेरे निवडणूक रिंगणात उतरवले आहेत, तर भाजपाने २२ नवीन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पालिका निवडणुकीत विद्यमान १३ नगरसेवकांपैकी पुन्हा पालिकेत जाण्यासाठी जनता कोणाला संधी देते याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.