शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांच्या ३९० पैकी अवघ्या ६१ दुचाकींचा लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:13 IST

नाशिककरांच्या दुचाकी वर्दळीच्या ठिकाणे असो की, स्वत:च्या घराच्या इमारतींचे वाहनतळ असो, कोठेही सुरक्षित राहिल्याचे चित्र सध्या दिसत नाही. लॉकडाऊन ...

नाशिककरांच्या दुचाकी वर्दळीच्या ठिकाणे असो की, स्वत:च्या घराच्या इमारतींचे वाहनतळ असो, कोठेही सुरक्षित राहिल्याचे चित्र सध्या दिसत नाही. लॉकडाऊन शिथिल होताच, शहरात दुचाकी चोरांनी धडाकाच लावला. चालू वर्षाच्या अखेरच्या तीन महिन्यांमध्ये दुचाकीचोरीचे प्रमाण अधिक राहिले. शहरात दररोज एक तरी पोलीस ठाण्यात दुचाकी लांबविल्याच्या तक्रारी दाखल होतात. दरदिवशी शहरात कमीतकमी दोन तर जास्तीतजास्त पाच दुचाकी गायब होत आहेत. दुचाकीचोरीचा सिलसिला हा अचानकपणे वाढल्याने नाशिकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालय, भाजी बाजार, गोदाकाठ परिसर, मॉल यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांसह रहिवाशांच्या इमारतींच्या वाहनतळांमधूनही दुचाकी लांबविण्याचेही धाडस चोरट्यांकडून करण्यात आले आहे. दुचाकी चोरीची मालिका एका बाजूला सुरू असताना, दुसरीकडे मात्र दुचाकीचोरांचा मागमूस लावण्यास पोलिसांना अपयश येत आहे. गुन्हे शाखा वगळता, सर्वच पोलीस ठाण्याची गुन्हे शोध पथकांना मात्र दुचाकीचोरांचा माग काढणे शक्य होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

---इन्फो---

गाड्यांची पुन्हा विक्री

चोरी केलेल्या दुचाकींचा मूळ क्रमांक व चेसी क्रमांकासोबत छेडछाड करून रंग बदलून, त्या गाड्यांनी पुन्हा चोरट्यांकडून कमी किमतीत विक्री केली जाते, तसेच परजिल्ह्यात दुचाकी विक्रीचा ‘काळा बाजार’ दिवसेंदिवस व्यापक स्वरूप धारण करत आहे. दुचाकीचोरांची साखळी लॉकडाऊननंतर अधिकच भक्कम झाल्याचे दिसते.

--इन्फो--

एक टोळी गजाआड

गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने नुकतीच आंतरजिल्हास्तरावर सक्रिय असलेल्या दुचाकी चोरांच्या एका टोळीच्या मालेगावातून मुसक्या बांधल्या आहेत. या चोरट्यांकडून शहरातील जुने नाशिक भागात चोरी केलेल्या दुचाकींचे गुन्हे उघडकीस आले असून, तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

---

पॉइंटर्स : - ३९० दुचाकी वर्षभरात चोरीला

६१ दुचाकींचा वर्षभरात लागला शोध

-----

फोटो : २८बाइक नावाने फोटो सेव्ह आर वर.

डमी फॉरमेट आर वर २८स्टोलन बाईक नावाने सेवी्ह आहे.