शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

आम्हा ब्रह्मांड पंढरी।

By admin | Updated: July 15, 2016 23:48 IST

आम्हा ब्रह्मांड पंढरी।

नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी दिंडी काढून वारकऱ्यांसमवेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भागवत संप्रदायाची पताका फडकविली. संत परंपरा, पंढरपूर व आषाढी एकादशीचे महत्त्व याच सोबत वृक्षारोपणाचा संदेश यानिमित्त देण्यात आला. विठ्ठल मंदिरांमध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विधिवत पूजा करून आरती केली व प्रसादाचे वाटपही केले.विठुनामाचा गजरयेवला : आषाढी एकादशीनिमित्त शहर व तालुक्यातून सुमारे १२५ दिंड्यांनी टाळ-मृदंगाच्या साथीने विठूचा नामगजर करत कोटमगाव बुद्रूक येथील विठ्ठल मंदिरात हजेरी लावली. यंदा शहरातील स्वामी मुक्तानंद प्राथमिक विद्यामंदिर, जनता प्राथमिक विद्यालय, ओम गुरु देव इंग्रजी माध्यम या शाळांनी विठूरायाचा गजर शहरात केला. विठ्ठल-रु खमाईची पालखी काढली. पंढरीचे बालवारकरी, कलशधारी मुली, डोक्यावर तुळस घेतलेल्या मुली विविध पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढली. येवला शहर या निमित्ताने पंढरपूरची मिनी आवृत्तीच झाले. येवले शहरातील मध्यवस्तीतील विठ्ठल मंदिरातून विठुनामाचा गजर करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत अग्रभागी बँँडपथक आणि भगवे झेंडे होते. ग्यानबा-तुकाराम म्हणत टाळकरी मिरवणुकीत सहभागी झाले होते. पारंपरिक लाकडी रथातून विठोबा-रखूमाईची प्रतिमा ठेवली होती. विठ्ठल मंदिराचे पुजारी दिलीप पाटील, ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली, नारायण मामा शिंदे, सतीश संत, प्रभाकर झळके, अविनाश पाटील यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.