शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

... अन‌् आदिवासी बांधवांचे झाले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:09 IST

देवळा : कोविड लसीचे इंजेक्शन घेतल्यानंतर खूप थंडी वाजून ताप येतो, यामुळे आतापर्यंत बरेच लोक मरून गेले आहेत, कोरोना हा आजारच नाही ही फक्त भीती आहे, आम्हाला गरिबांना काही होणार नाही असे अनेक गैरसमज असलेल्या आदिवासींची समजूत काढत कोविडची लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात गुंजाळनगर येथील कोरोना दक्षता समितीला अखेर यश आले आहे. त्यानुसार १५ आदिवासी बांधवांनी उत्साहात कोविड लसीकरण करून घेतले.

ठळक मुद्देगैरसमज दूर : गुंजाळनगरला विशेष शिबिराचा घेतला लाभगुंजाळनगर येथे कोविड लसीकरणाचा आदिवासी बांधवांनी घेतला लाभ

देवळा : कोविड लसीचे इंजेक्शन घेतल्यानंतर खूप थंडी वाजून ताप येतो, यामुळे आतापर्यंत बरेच लोक मरून गेले आहेत, कोरोना हा आजारच नाही ही फक्त भीती आहे, आम्हाला गरिबांना काही होणार नाही असे अनेक गैरसमज असलेल्या आदिवासींची समजूत काढत कोविडची लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात गुंजाळनगर येथील कोरोना दक्षता समितीला अखेर यश आले आहे. त्यानुसार १५ आदिवासी बांधवांनी उत्साहात कोविड लसीकरण करून घेतले.तालुक्यात गुंजाळनगर येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी कोरोना दक्षता समिती, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक होऊन कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कडक धोरण अवलंबण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाबाबत शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई तसेच गावात जनजागृती मोहीम राबवून कोरोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागातील कोरोना चाचणी संख्या वाढविणे व गावात लसीकरण शिबीर घेणे आदी निर्णय घेण्यात आले होते.या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शनिवारी (दि.१७) गुंजाळनगर येथील जि. प. प्राथमिक शाळेत कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील एकूण १३३ नागरिकांनी लसीकरण करून घेतले. त्यात आदिवासी बांधवांचेही गैरसमज दूर करून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यात आले. यासाठी ग्रामसेवक वैभव निकम, तंटामुक्तीचे अध्यक्ष दीपक जाधव, ग्रामपंचायत सदस्य डॉ. राजेंद्र गुंजाळ, सुजाता गुंजाळ, माजी सरपंच सतीश गुंजाळ, प्रवीण गुंजाळ, डॉ. संजय निकम, पप्पू गुंजाळ, नानू आहेर, संदीप देवरे, आशासेविका आदींनी परिश्रम घेतले.तालुक्यातील अनेक गावांत आदिवासी बांधव भीती व गैरसमजामुळे कोविड लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. त्या गावातील खासगी डॉक्टर व ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन आदिवासी बांधवांच्या मनातील भीती दूर करावी व त्यांचे लसीकरण करून घ्यावे.- डॉ. राजेंद्र गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य, गुंजाळनगर---- आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्यामुळे कर्मचारीसंख्या कमी आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ४५ वर्षांपुढील नागरिकांची पुरेशा प्रमाणात नोंदणी करून मागणी केल्यानंतर गावागावांत कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात येईल.- डॉ. सुभाष मांडगे, तालुका आरोग्य अधिकारी, देवळा.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल