शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचारी अन्य कामात; वसुलीवर परिणाम

By admin | Updated: August 1, 2016 01:02 IST

पदवीधर निवडणूक : १२० कर्मचारी नियुक्त

नाशिक : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कामासाठी बीएओ म्हणून जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी विभागांतील १२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने गेल्या तीन महिन्यांपासून मनपाचे करवसुलीचे कामकाज ठप्प झाले आहे. प्रामुख्याने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर त्याचा परिणाम झाला आहे.नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार असून, त्यासाठी मतदार नाव नोंदणीचे काम सुरू आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने बीएलओंची नियुक्ती केली आहे. त्यात महापालिकेतील घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील सुमारे १२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सदर कर्मचाऱ्यांची नियुक्ती १५ जुलैपर्यंत होती. परंतु ती ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली. प्रत्यक्ष वसुली करणारेच कर्मचारी उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. मागील वर्षी महापालिकेने १ एप्रिल ते २८ जुलै २०१५ या कालावधीत ३८ कोटी ९८ लाख रुपये घरपट्टी वसूल केली होती. परंतु यंदा चार महिन्यात २७ कोटी ५६ लाख रुपयेच वसुली होऊ शकली आहे, तर मागील वर्षी महापालिकेने आठ कोटी सात लाख रुपये पाणीपट्टी वसूल केली होती, यंदा ती केवळ पाच कोटी ८८ लाख रुपयेच वसूल होऊ शकली आहे. शहरात करवसुलीसाठी २११ ब्लॉक असून, त्यासाठी ११९ कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु सदर सर्वच कर्मचारी हे निवडणूक कामात व्यस्त असल्याने मनपाच्या करवसुली विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. (प्रतिनिधी)