शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

लोकमत समूहातर्फे ‘महामॅरेथॉन’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:30 IST

शहरातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच अ‍ॅथलिट क्रीडा प्रकाराला चालना मिळावी, या हेतूने लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे रविवार, दि. ८ आॅक्टोबर रोजी महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचा लोगो अनावरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

ठळक मुद्देस्पर्धेचा लोगो अनावरण सोहळा ८ आॅक्टोबर रोजी महामॅरेथॉनचे आयोजन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू

नाशिक : शहरातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच अ‍ॅथलिट क्रीडा प्रकाराला चालना मिळावी, या हेतूने लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे रविवार, दि. ८ आॅक्टोबर रोजी महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचा लोगो अनावरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.नाशिक जिल्ह्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत यश संपादन करणारे धावपटू दिले आहेत. विविध संस्था, संघटनातर्फे नाशकात प्रतिवर्षी महामॅरेथॉन घेऊन या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले जात असतात, त्याच मालिकेत ‘लोकमत’नेही पुढाकार घेऊन ८ आॅक्टोबर रोजी महामॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या महामॅरेथॉनच्या लोगो अनावरणप्रसंगी आॅलिम्पिक धावपटू कविता राऊत तसेच आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव यांसह जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, नाशिक जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशन, नाशिकचे सचिव हेमंत पांडे, उपसचिव राजीव जोशी, क्रीडा प्रशिक्षक विजेंदरसिंग आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘लोकमत’ आयोजित या मॅरेथॉनमुळे नाशिकच्या क्रीडा विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.२१ कि .मी.साठी घेण्यात येणाºया स्पर्धेसाठी १८ ते ४० वयोगटातील पुरुष, १८ ते ४५ वयोगटातील महिला, ४० वर्षावरील पुरुष, ४५ वर्षावरील महिला गटातील विजेत्यास अनुक्रमे २५ हजार, २० हजार व १५ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. २१ कि.मी. धावणे प्रकारात विदेशी स्पर्धकांसाठी पुरुष आणि महिला गटातील विजेत्यास अनुक्रमे २० हजार आणि १५ हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.१० कि.मी.साठी घेण्यात येणाºया स्पर्धेत १८ ते ४० वयोगटातील पुरुष, १८ ते ४५ वयोगटातील महिला, ४० वर्षावरील पुरुष, ४५ वर्षावरील महिला गटासाठी अनुक्रमे १५ हजार, १२ हजार आणि १० हजार रुपये तसेच विदेशी स्पर्धकांसाठी पुरुष आणि महिला गटासाठी अनुक्रमे १५ हजार आणि १० हजार रुपये रोख रक्कम देत सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू असून २१ किमी अर्धमॅरेथॉन स्पर्धेसाठी १००० रुपये, १० किमी पॉवर रनसाठी ८०० रुपये, ५ किमी फन रनसाठी ५०० रुपये तसेच संपूर्ण परिवारासाठी घेण्यात येणाºया ३ किमी फॅमिली रनसाठी १००० हजार रुपये प्रवेश फी आकारण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नाव नोंदणी केल्यानंतर स्पर्धकांना आकर्षक टी शर्ट आणि हेल्थ किटसुद्धा देण्यात येणार असून, नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या महामॅरेथॉन स्पर्धेच्या लोगो अनावरण सोहळ्यास विविध मान्यवरांसह आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले किसन तडवी, पूनम सोनवणे, रणजीतकुमार पटेल, कांतीलाल कुंभार, आरती पाटील यांच्यासह महेश तुंगार आदीही प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमत समूहातर्फे गेल्यावर्षी औरंगाबाद येथे अशी महामॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली असून, यावर्षी नाशिकसह कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे स्पर्धा भरविण्यात येणार आहे. विविध गटात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेला त्र्यंबकरोड येथील गोल्फ क्लब मैदानापासून सुरुवात होणार असून, २१ किमी स्पर्धेसाठी गोल्फ क्लब मैदान, मायको सर्कल, सकाळ सर्कल, पपयाज् नर्सरी, सुला वाइनयार्ड राऊंड, अशोकनगर पोलीस चौकी, अशोकनगर, कार्बन नाका, मोतीवाला मेडिकल कॉलेज, साधना मिसळ, बारदान फाटा, सोमेश्वर, आनंदवलीगाव, जेहान सर्कल, विद्या विकास सर्कल, डोंगरे वसतिगृह मैदान सर्कल, अशोकस्तंभ सर्कल, मेहेर चौक, त्र्यंबक नाका मार्गे पुन्हा गोल्फ क्लब मैदान असा मार्ग राहणार आहे. १० किमीसाठी गोल्फ क्लब मैदान, मायको सर्कल, एबीबी सर्कल, जेहान सर्कल, विद्या विकास सर्कल, डोंगरे वसतिगृह, अशोकस्तंभ, मेहेर चौक, त्र्यंबक नाका मार्गे परत गोल्फ क्लब मैदान असा मार्ग राहणार आहे.५ किमी फन रनसाठी गोल्फ क्लब, मायको सर्कल, एबीबी सर्कल येथून वळसा घेऊन याच मार्गाने पुन्हा गोल्फ क्लब मैदान येथे परत तसेच ३ किमी फॅमिली रनसाठी गोल्फ क्लब मैदान, मायको सर्कल हॉटेल ग्रीन व्ह्यू जवळील सिग्नल जवळून वळसा घेऊन याच मार्गाने गोल्फ क्लब मैदान येथे परत असा मार्ग राहणार आहे.पोलीस आणि लष्कराच्या जवानांनादेखील या स्पर्धेत सहभागी होता येणार असून पुरुष आणि महिला गटातील विजेत्यास अनुक्रमे २५ हजार, २० हजार व १५ हजार रुपयांची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत करून मॅरेथॉनच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी आभार मानले.