येवला : भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र व येथील स्वयंसेवी संस्था खटपट युवा मंचच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दीपावलीनिमित्त विविध सामाजिक उपक्र म व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दीपावली म्हणजे दीपोत्सव अशा या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उत्कृष्ट पणती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, इच्छुकांनी बुधवारी (दि. २६) वसूबारसेला केवळ एक पणती आकर्षक सजवून, रंगवून आणावयाची आहे. १५ वर्षांआतील व त्या पुढील वयोगट अशा दोन गटात ही स्पर्धा होणार असून, आकर्षक पणती सजवून आणणाऱ्या स्पर्धकास बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा ही शिंपी गल्ली येथील नामदेव मंदिरात होणार आहे.दीपावलीच्या आनंदात गरीब व गरजूंना सहभागी करून घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने वस्त्रदान व फराळ जमा करण्यात यावा, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक भगवान गवई, प्रभाकर झळके, खटपट युवा मंचचे अध्यक्ष मुकेश लचके यांनी केले आहे. (वार्ताहर)
दीपावलीनिमित्त येवल्यात विविध उपक्र मांचे आयोजन
By admin | Updated: October 22, 2016 23:42 IST