शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

संघटना जाणार न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:16 IST

गेल्या १७ आॅक्टोबर रोजी वेतन आयोगाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांच्या वेतन कपातीचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मात्र या निर्णयास एसटी कामगार संघटनेने आक्षेप घेतला असून वेतन कपातीच्या विरोधात संघटना न्यायालयात दाद मागणार असल्याचे संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी कळविले आहे. दरम्यान, वेतन कपातीबाबतचे परिपत्र काढण्यात आल्यानंतर संघटनेच्या कामगारांनी तीव्र नाराजी दर्शविली.

नाशिक : गेल्या १७ आॅक्टोबर रोजी वेतन आयोगाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांच्या वेतन कपातीचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मात्र या निर्णयास एसटी कामगार संघटनेने आक्षेप घेतला असून वेतन कपातीच्या विरोधात संघटना न्यायालयात दाद मागणार असल्याचे संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी कळविले आहे. दरम्यान, वेतन कपातीबाबतचे परिपत्र काढण्यात आल्यानंतर संघटनेच्या कामगारांनी तीव्र नाराजी दर्शविली. मागील महिन्यात १७ ते २० आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या संपाची भरपाई म्हणून ३६ दिवस वेतन कपात करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या निर्णयाचे कर्मचाºयांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून एकही पैसा वसूल करून दिला जाणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. वास्तविक यापूर्वी संप काळातील वेतन कपात ही ‘ना काम व दाम’ या तत्त्वानुसार केली जाते. असे असतानादेखील महामंडळाने एक दिवसाला आठ दिवसाचे वेतन कपात करण्याचा घेतलेला निर्णय गैर असल्याचे ताटे यांचे म्हणणे आहे.  वेतन कपात करण्याबाबत २५ जानेवारी २०१६ रोजी ठाणे औद्योगिंक न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे असतानादेखील कोणते नियम आणि निकषाच्या आधारावर वेतन कपात केली जात आहे, अशी विचारणा कामगारांकडून होऊ लागली आहे.  दरम्यान, यासंदर्भात संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्षविजय पवार यांनी कोणत्याही कर्मचाºयावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी संघटनेची भूमिका असल्याचे सांगून कायदेशीर लढाई लढण्याबाबत संघटना ठाम असल्याचे म्हटले आहे.न्यायप्रविष्ट  प्रकरणसंपकºयांच्या वेतनातून कपात करणे नियमबाह्य असल्याबाबत दि. २३ आणि २७ रोजी महामंडळ व प्रशासनास कळविण्यात आल्याचा दावा एसटी कामगार संघटनेने केला आहे. तरीही वेतन कपात होत असेल तर कायदेशीर लढा देण्याचा निर्धार देणार असल्याचे सांगण्यात आले.   वेतन वाढीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाने राज्य परिवहन कामगारांच्या वेतन वाढीसंबंधात उच्चस्तरीय समिती नेमलेली असून त्याचा निर्णय अपेक्षित असताना व अद्याप कामगारांच्या वेतन वाढीचा निर्णय झालेला नसल्याने कामगारांच्या संतापात अजूनच भर पडलेली आहे.