शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

वाहने जमा करण्याचे आदेश

By admin | Updated: January 6, 2017 01:00 IST

पदवीधर निवडणूक : जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू

नाशिक : नाशिक विभाग पदवीधर निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना त्यांची सरकारी वाहने जमा करण्याचे आदेश दिले आहेत.गुरुवारी (दि. ५) यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एक पत्र काढून सामान्य प्रशासन विभागाला आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली सरकारी वाहने तत्काळ जमा करून त्यांना पुरविण्यात आलेली दूरध्वनी सेवाही खंडित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव, महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे, कृषी व पशुसंवर्धन केदा अहेर यांच्याकडे सरकारी वाहने असून, त्यांना सर्वांना वाहने जमा करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र काढून दिल्या आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत मात्र एकही वाहन जमा झाले नसल्याचे चित्र होते. तसेच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषदेतील कोनशिला झाकण्यात आल्या आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या दूरध्वनी सेवा खंडित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे समजते. आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधींची वर्दळ कमी झाल्याचे चित्र होते. सायंकाळी मात्र उपाध्यक्ष प्रकाश वडजे त्यांच्या खासगी वाहनाने जिल्हा परिषदेत आले. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, माजी सभापती हिरामण खोसकर, निवृत्ती जाधव, सुनील वाजे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)