शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:27 IST

: ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ असे उपहासाने म्हणून सरकारी यंत्रणेची खिल्ली उडविली जात असली तरी, हीच सरकारी यंत्रणा किती तत्पर आहे याचा आश्चर्यकारक अनुभव सिन्नरच्या एका शेतकºयाला आला आहे. नाशिकच्या अपर जिल्हाधिकाºयांकडे कूळ कायद्याच्या जमीन विक्रीसाठी प्रकरण दाखल केले

नाशिक : ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ असे उपहासाने म्हणून सरकारी यंत्रणेची खिल्ली उडविली जात असली तरी, हीच सरकारी यंत्रणा किती तत्पर आहे याचा आश्चर्यकारक अनुभव सिन्नरच्या एका शेतकºयाला आला आहे. नाशिकच्या अपर जिल्हाधिकाºयांकडे कूळ कायद्याच्या जमीन विक्रीसाठी प्रकरण दाखल केले असता, तत्कालीन अपर जिल्हाधिकारी बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर त्यांच्या स्वाक्षरीचे आदेश पारित करण्यात आले आहे. सदर प्रकरणात महसूल यंत्रणेने आपल्याच अधिकाºयाची बनावट सही ठोकून या जमीन घोटाळ्यात हातभार लावल्याचे स्पष्ट झाले आहे.  सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील गट नंबर १७४ ही वतन इनाम वर्ग ६ ब ची सुमारे १३.४० हेक्टर जमीन असून, बाबुराव मारुती जगताप व इतरांच्या मालकीची असल्याने कुळाची असलेली ही जमीन विक्रीसाठी जिल्हाधिकाºयांच्या अनुमतीची गरज असते. जिल्हाधिकाºयांनी सदरचे अधिकार अपर जिल्हाधिकाºयांना वर्ग केलेले असल्याने २००८ मध्ये सदरचे प्रकरण तत्कालीन अपर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे सादर करण्यात आले होते. त्यांनी या जमिनीशी संबंधित व्यक्ती तसेच जमीन खरेदी करणाºया व्यक्तींचे म्हणणे जाणून घेऊन त्यावर सुनावणी घेतली. दरम्यान, शेखर गायकवाड यांची मार्च २००९ मध्ये बदली झाल्याने ते बदलीच्या दुसºयाच दिवशीच दुसºया ठिकाणी रुजू झाले व त्यांच्या नंतर राधाकृष्ण गमे यांची अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. असे असताना कासारवाडी येथील सदरची जमीन इनाम वतनातून खालसा करून त्याची विक्री करण्याची अनुमती गमे यांच्या स्वाक्षरीने निघणे अपेक्षित होते. परंतु महसूल खात्याच्या संबंधित अधिकारी, कर्मचाºयांनी डिसेंबर २००९ मध्ये जमीन मालक आनंदा गंगाराम जगताप यांच्याकडून दहापट नजराणाची रक्कम भरून घेतल्याचे दर्शवून तत्कालीन अपर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या स्वाक्षरीने जमीन विक्रीची अनुमती देणारे आदेश जारी केले आहेत. विशेष म्हणजे सदरचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी होताच, अवघ्या ३१ डिसेंबर रोजी या जमिनीचे विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्यात आले आहेत. शेखर गायकवाड यांची बदली झालेली असताना त्यांच्या स्वाक्षरीने उशिराचे आदेश कसे व कोणी काढले याबाबतचे गूढ कायम असून, यात महसूल यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचाºयांनी संगनमताने गायकवाड यांची बनावट स्वाक्षरी करून जमीन विक्रीचे आदेश जारी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयfraudधोकेबाजी