शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मतदार याद्या २० जूनपर्यंत अद्ययावत करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:18 IST

मतदार यादी शुद्धिकरणासाठी निवडणूक आयोगाने मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन याद्यांच्या पडताळणीसाठी माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच काम पूर्ण झाले असून, बुधवारी (दि. १३) पुन्हा एकदा बीएलओंची बैठक घेऊन २० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

नाशिक : मतदार यादी शुद्धिकरणासाठी निवडणूक आयोगाने मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन याद्यांच्या पडताळणीसाठी माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच काम पूर्ण झाले असून, बुधवारी (दि. १३) पुन्हा एकदा बीएलओंची बैठक घेऊन २० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  आगामी वर्षात लोकसभेसह विधानसभा निवडणुकाही असून, निवडणूक यंत्रणेची जबाबदारी वाढलेली असताना मतदार याद्या अद्ययावत करण्याचे आयोगाचे आदेश असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या शुद्धिकरणाचा कार्यक्र म जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जवळपास दीड लाख मतदारांची दुबार नावे आहेत. तसेच अनेकांचे रंगीत फोटो यादीत अद्ययावत केलेले नाही. काहींचे पत्ते चुकीचे आणि अपूर्ण आहेत. मतदारांकडे मतदान ओळखपत्रही नाहीत. स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावेही यादीत कायम आहेत. यामुळे बोगस मतदानाचीही शक्यता अधिक असताना पाठपुरावा करूनही अनेक मतदारांची मतदार यादीत नावे समाविष्ट झालेली नसल्याने असे नागरिक त्यांच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीतही नाशिक जिल्ह्यात या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामाबाबत उदासीनता दिसून येत आहे.ग्रामीण भागाकडे दुर्लक्षजिल्ह्यात ३४ लाख १५ हजार ५८० मतदार असून, मोहीम मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होण्यापूर्वी ४ लाख २ हजार १४४ मतदारांच्या घरांना भेटी देण्यात आल्या. मोहीम सुरू झाल्यानंतर ११ लाख २१ हजार ६५८ मतदारांची पडताळणी करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८ जूनपर्यंत ५ लाख ३६ हजार ९८५ मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, एकूण मतदार संख्येच्या ४७.८७ टक्केच अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यात ग्रामीण भागातील मतदारांची माहिती अद्ययावत करण्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून, अनेकदा पाठपुरावा करूनही मतदार यादीत नावाचा समावेश व माहितीची दुरुस्ती होत नसल्याने ग्रामीण भागातून नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक