शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसेसवरील जाहिराती काढून टाकण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:43 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होण्याची शक्यता गृहित धरून राज्य परिवहन महामंडळाने बसेसवरील राज्य शासनाच्या जाहिराती काढून घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला केल्या आहेत. त्यामुळे विभागातील बसेसवर असलेल्या जाहिराती काढण्याच्या कार्यवाहीला काही डेपोंमधून सुरुवातदेखील झाली आहे.

ठळक मुद्देसंबंधित ठेकेदारांवरच सोपविली जबाबदारी

नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होण्याची शक्यता गृहित धरून राज्य परिवहन महामंडळाने बसेसवरील राज्य शासनाच्या जाहिराती काढून घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला केल्या आहेत. त्यामुळे विभागातील बसेसवर असलेल्या जाहिराती काढण्याच्या कार्यवाहीला काही डेपोंमधून सुरुवातदेखील झाली आहे.राज्य शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या जाहिराती या मोठ्या प्रमाणावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवरून झळकविल्या जातात. बसेसच्या आतील आणि बाह्य बाजूला अशा प्रकारच्या जाहिराती लावण्याची परवाना संबंधित ठेकेदाराला दिली जाते. त्यानुसार बसेसवर चार रंगांतील जाहिराती बसच्या दोन्ही बाजूला तसेच मागील बाजूस लावण्यात आलेल्या आहेत. बसच्या आतील भागातदेखील यंदा जाहिराती करण्यात आलेल्या आहेत. नाशिक विभागात असलेल्या सुमारे दीड हजार बसेसवर सध्या शासनाच्या जाहिराती झळकत असल्याने या जाहिराती काढून घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.नाशिकमधील अनेक बसेसवर अद्यापही या जाहिराती झळकत असल्या तरी येत्या दोन दिवसांत या जाहिराती काढल्या जाणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. प्राथमिक पातळीवर मार्गावर धावणाºया सर्व बससेवरील जाहिराती काढण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच दैनंदिन शहरातील बसेसेवरील जाहिरातील काढण्यालादेखील प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या गाड्या डेपोत तसेच कार्यशाळेत कामकाजासाठी उभ्या आहेत त्या गाड्यांवरील जाहिरातीदेखील काढण्यात येणार आहेत.जाहिराती लावण्याचे कंत्राट घेणाºया ठेकादारालाच या जाहिराती काढून घेण्याचेदेखील आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या मुख्य आणि उपठेकेदारांनी कामे मिळविली आहेत त्यांनाच या जाहिराती काढून घ्याव्या लागणार आहेत. बसेसवरील जाहिरातींचे कंत्राट हे मुंबईतूनच देण्यात येत असल्यामुळे स्थानिक पातळीवर याचा कोणताही संबंध नसल्याचेही समजते.एसटी कर्मचाऱ्यांचा वापर नकोबसेसवरील जाहिराती काढण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष आचारसंहिता जाहीर होईपर्यंत अनेक बसेसवरील जाहिराती कायम राहण्याचा धोका लक्षात घेता स्थानिक पातळीवरील संबंधित अधिकारी आपल्या कर्मचाºयांमार्फत बसेसवरील जाहिराती काढून घेण्यासाठी पुढाकार घेतात. वास्तविक आचारसंहितेचा भंग नको म्हणून अधिकारी पुढाकार घेत असले तरी ठेकादराकडून विलंब केवळ याच कारणामुळे केला जात असल्याचीही चर्चा आहे. ठेकेदाराला अशावेळी आपले मनुष्यबळ वापरावे लागत नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक विलंब होतो, असा आरोप एसटीतील काही कर्मचारी नेत्यांनी केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार