शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 18:22 IST

सोमवारी दुपारनंतर हवामानात अचानक झालेल्या बदलाचा फटका दुस-या दिवशीही कायम राहिला. मंगळवारी सकाळी सात वाजेनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले.

ठळक मुद्देआॅक्टोंबरच्या भरपाईची प्रतिक्षा : १२५ मिली मीटर पावसाची नोंद अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले

नाशिक : ओखी चक्रीवादळामुळे बदललेल्या हवामानामुळे हवेत गारवा वाढून अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून, आठ तासात सुमारे १२५ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे द्राक्षबागांसह भाजीपाला, कांदा, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. आॅक्टोंबर महिन्यात अशाच प्रकारे वादळी पावसाने केलेल्या नुकसानीची अद्यापही शेतक-यांना भरपाई मिळालेली नसताना त्यात पुन्हा नव्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सोमवारी दुपारनंतर हवामानात अचानक झालेल्या बदलाचा फटका दुस-या दिवशीही कायम राहिला. मंगळवारी सकाळी सात वाजेनंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले. वादळी वा-यासह सुरू झालेल्या या पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला. आॅक्टोंबरच्या अवकाळी पावसापासून कसेबसे बचावलेल्या द्राक्ष बागांवर संकट कोसळले. पावसामुळे द्राक्षांचे घडे तुटून पडले तर काहीं बागांमध्ये मणी गळून पडण्याचे प्रकार घडले. द्राक्षबागेत पावसाचे पाणी साचल्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर मोठे संकट कोसळले आहे. त्याच बरोबर विक्रीसाठी काढून ठेवलेला मका तसेच उघड्यावरील लाल कांदाही पावसाच्या पाण्यात भिजून मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. भाजीपाला व शेतातील गहू, हरभरा पिकालाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ हवामान व पावसाची हजेरी कायम होती त्यामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला. नागरिकांनी घराबाहेर पडण्यास नापसंती व्यक्त केली तर नोकरदारांचीही धावपळ उडाली.गेल्या दोन महिन्यात अवकाळी पावसाने तीन वेळा हजेरी लावून नुकसान केल्यामुळे मंगळवारी जिल्हा प्रशासनाने तलाठी, मंडल अधिकारी, कृषी विभागाला शेतक-यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन दिवसात पंचनामे पुर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतरच ख-या अर्थाने नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे. आॅक्टोंबर महिन्यात अशाच प्रकारे दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने सुमारे साडेसहाशे गावातील ५० हजार शेतक-यांचे नुकसान झाले असून, त्याचा अहवाल गेल्या आठवड्यातच कृषी खात्याकडून सादर करण्यात आला आहे. या नुकसानीची अद्याप शेतक-यांना भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे ओखी वादळामुळे झालेल्या नुकसानीची त्यात भर पडल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कांदा व मक्याला चांगला भाव मिळू लागलेला असताना तसेच द्राक्ष काढणीवर आलेले असताना अस्मानी संकट कोसळले आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक