शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या कोविडसाठी आधीच औषधांची मागणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी वैद्यकीय व्यवसायिकांनी त्रिसूत्री मांडली. त्यानुसार पालक, प्रौढ नागरिक आणि शिक्षक यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करावे, ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी वैद्यकीय व्यवसायिकांनी त्रिसूत्री मांडली. त्यानुसार पालक, प्रौढ नागरिक आणि शिक्षक यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करावे, दुसरी बाब म्हणजे बालकांच्या कोविडवरील उपचारासाठी लागणारी औषधे आणि व्हेंटिलेटर्सची आताच मागणी नोंदवून ठेवावी तसेच पुरेशा ऑक्सिजनची सोय करावी जेणेकरून ऐनवेळी संकट येणार नाही तसेच औषधांची टंचाई होणार नाही त्याचप्रमाणे आधी यासंदर्भात जनजागृती करावी अशाप्रकारची मागणी व्यवसायिकांनी केली. महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेकडून पुरेशा औषध साठ्याची व्यवस्था करताना कोरोना कसा टाळता येईल तसेच भीतीचे वातावरण घालवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. कोरोनाबाधितांवर उपचार करताना कोविड आणि नॉन कोविड असे दोन भाग करावेत, असे त्यानुसार नियोजन करावे, असे सांगितले तर डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी बालकांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सेवकांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले.

या बैठकीस आयएमएच्या सेक्रेटरी कविता गाडेकर, बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या सेक्रेटरी डॉ. रिना राठी, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. मिलिंद भराडिया, डॉ. सागर सोनवणे, डॉ. संजय आहेर, डॉ. नितीन सुराणा, डॉ. श्रेयस गायधनी डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. नवीन बाजी, डॉ. शलाका बागुल, डॉ. ललित बागुल, डॉ. विनोद पावस्कर आदी उपस्थित होते.

कोट...

लहान मुलांना कोरोना होऊच नये यासाठी महापालिकेच्या मार्गदर्शन करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे तसेच खासगी रुग्णालयांना सहकार्य करण्यात येणार आहे.

- सतीश कुलकर्णी,महापौर

कोट..

सध्या बाल रुग्णालयात सहाशे बेडस उपलब्ध आहेत. मात्र, कोविड रुग्णालय सुरू करताना महापालिकेने परवानगीची प्रक्रिया सुलभ करावी यासह काही सूचना बालरोगतज्ज्ञांनी केल्या आहेत.

- डॉ. हेमंत सोननीस, अध्यक्ष आयएए, नाशिक

------

छायाचित्र आर फोटोवर १४ एनएमसी...कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेबाबत बालरोग तज्ज्ञांच्या बैठकीत बोलताना महापौर सतीश कुलकर्णी.