शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठ भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविण्याचे आदेश

By admin | Updated: September 7, 2015 23:12 IST

गोदाकाठ भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविण्याचे आदेश

निफाड : अनेक महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या गोदाकाठ भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यांच्या संख्येत त्वरित वाढ करावी, असा आदेश वनवित्त व नियोजन विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनखात्याच्या सचिवांना दिले. गोदाकाठातील भाजपाचे युवा कार्यकर्ते शरद नाठे, आदेश सानप यांनी मुनगंटीवार यांची भेट घेऊन गोदाकाठ भागाची परिस्थितीची जाणीव करून दिली व निवेदन दिले. सावधानतेच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला त्वरित पिंजऱ्यांमध्ये वाढ करण्याचे आदेश दिले.शरद नाठे व यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोदाकाठी भागातील शिंगवे, करंजगाव, सायखेडा, भुसे, चापडगाव, मांजरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा संचार आढळून आला असून, परिसरातील वस्त्यांवर राहणारे शेतकरी, मजूर, विद्यार्थी, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.घराबाहेर पडण्यास कोणीही धजावत नाही. याचा विचार करून या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, गोदाकाठ भागात मुख्यवन संरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक व एक मुख्य कार्यालय व्हावे, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी नागरिकांना त्वरित उपचार व मृत झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांना त्वरित मदत मिळावी, अशा मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत.या भागात बिबट्यांचा संचार वाढला असून, २ बालकांचा बिबट्याने जीव घेतला आहे, तर पशुधनावर प्राणघातक हल्लेही केले आहेत. गोदाकाठी मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने या ठिकाणी बिबट्यांचा नेहमी संचार असतोच. याचा विचार करून मागण्या पूर्ण कराव्यात. या प्रसंगी गोदाकाठ भागातील बिबट्याची दहशत नाठे यांनी मुनगुंटीवार यांना विशद केली. मुनगंटीवार यांनी तत्काळ संबंधित विभागाला पिंजऱ्यांत वाढ करण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)

 

बिबट्याचे पुन्हा दर्शन

तालुक्यातील शिवरे येथे बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने बाजीराव सानप यांच्या शेतात दुसऱ्यांदा पिंजरा लावला आहे. काही महिन्यांपासून निफाड तालुक्यात बिबट्यांनी पोषक परिस्थिती असलेल्या शिवरे येथे मुक्काम ठोकलेला आहे. महिन्यापूर्वी बाजीराव सानप यांच्या वालवडच्या शेतात बिबट्याने दर्शन दिल्यानंतर त्यास पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता. परंतु त्यानंतर सदर बिबट्या या भागातून गायब झाला होता. मात्र बिबट्याचा वावर शिवऱ्याच्या पट्ट्यात होता. शनिवारी या बिबट्याने पुन्हा सानप वस्तीजवळ दर्शन दिल्यानंतर शनिवारी बाजीराव सानप यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावावा लागला. परंतु रविवारी (दि. ६) या बिबट्याने मधुकर सानप यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना मक्याच्या शेतात सकाळी १०.३० च्या सुमारास दर्शन दिल्याने मजूरही घाबरून गेले. सोमवारी सायंकाळपर्यंत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला नव्हता.