शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘नामको’च्या निवडणुकीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:32 IST

गेल्या साडेचार वर्षांपासून नाशिक मर्चंट को-आॅप. बँक अर्थात ‘नामको’वर असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार असून, पुन्हा एकदा संचालक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे.

नाशिक : गेल्या साडेचार वर्षांपासून नाशिक मर्चंट को-आॅप. बँक अर्थात ‘नामको’वर असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार असून, पुन्हा एकदा संचालक मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बॅँकेने त्यासंदर्भात प्रशासक भोरीया यांना आदेश दिले असून येत्या ५ जानेवारीच्या आत संचालक मंडळाच्या हाती सूत्रे द्यावी, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळी संपताच निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे.  नाशिककरांची आर्थिक धमनी मानल्या जाणारी नाशिक मर्चंट बॅँक ही सद्य:स्थितीत अत्यंत जुनी मानली जाणारी बॅँक आहे. सुमारे १ लाख ८० हजार सभासद असलेल्या या बॅँकेचे कार्यक्षेत्र बहुराज्य असून या बॅँकेतील सत्ता एकवटल्याने राजकीय वादविवादही निर्माण होत होते. या बॅँकेचे सर्वेसर्वा (कै.) हुकूमचंद बागमार यांच्यावर पर्यायाने संचालक मंडळावर आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत रिझर्व बॅँकेने प्रशासक जे. एम. भोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर प्रशासकीय कारकिर्द वादग्रस्त ठरू लागताच बॅँकेचे माजी संचालक आणि काही सभासदांनी प्रशासकीय कारकिर्दीवर शंका उपस्थित केल्या होत्या शिवाय बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुका घेण्याचा ठराव करण्यात आला होता. हा ठराव प्रशासकांनी रिझर्व्ह बॅँकेकडे पाठविला नसल्याने त्यावरदेखील बरीच भवती न भवती झाली होती. बॅँकेची निवडणूक घ्यावी यासाठी माजी संचालक आणि काही सभासदांनी उचल घेतली होती. माजी संचालक वसंत गिते, गजानन शेलार, संतोष मंडलेचा तसेच श्रीधर व्यवहारे यांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन रिझर्व्ह बॅँकेपर्यंत भावना पोहोचवल्या होत्या.प्रशासकीय कारकिर्द वादग्रस्तनामको बँकेतील अनियमितता तसेच ग्राहक व ठेवीदारांमधील हितसंबंध जोपासण्यासाठी रिझर्व्ह बँकने (आरबीआय) प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने आरबीआयचे गोवा आणि महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त प्रादेशिक निर्देशक जे. बी. भोरिया यांची ६ जानेवारी २०१४ रोजी बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. बँकेवर प्रशासक नेमल्याची वार्ता सगळीकडे पसरताच एका आठवड्यात ४०० कोटी रुपयांच्या ठेवी ग्राहकांनी काढून घेत बँकेला उतरती कळा लावत मोठा धक्का दिला होता, अशा परिस्थितीत प्रशासक भोरिया यांनी बँकेची सूत्रे हाती घेतली होती. ६ जानेवारी २०१८ ला प्रशासक भोरिया यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. आरबीआयने ६ जानेवारी २०१९ पर्यंत भोरिया यांचा कार्यकाळ वाढविला.

टॅग्स :bankबँक