शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत विसर्जित करण्याचे आदेश

By admin | Updated: October 1, 2015 00:01 IST

नागडे येथील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ

येवला : तालुक्यातील नागडे येथील अतिक्र मण काढण्यास येवला पंचायत समितीसह नागडे ग्रामपंचायतीने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर यांनी नागडे ग्रामपंचायत विसर्जित (विघटित) करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवावा, असा आदेश येवला गटविकास अधिकाऱ्यांना दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्याच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे.अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाहीला येवला पंचायत समितीसह नागडे ग्रामपंचायतीने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिल्याच्या निषेधार्थ सागर साळी यांनी थेट जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आत्मदहन करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला होता. यासाठी गेल्या दोन वर्षांत तीन वेळा उपोषणाचा मार्ग अवलंबला गेला. उपोषण अखेर यशस्वी होऊन अतिक्र मण काढण्याची कार्यवाही सुरू झाली होती. अतिक्रमण काढण्यास चालढकल केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका गटविकास अधिकारी यांनी घेतली होती; मात्र अतिक्रमणाची कार्यवाही पुन्हा लालफितीत अडकली. अतिक्रमण काढण्याबाबत कार्यवाही झाली नाही, तर आंदोलनकर्ते सागर साळी यांनी २९ सप्टेंबरला कोणत्याही क्षणी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. आत्मदहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत मंगळवारी जोरदार हालचाली झाल्या. दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी गटविकास अधिकारी यांना स्पष्ट आदेश दिले. या आदेशात म्हटले आहे की, आंदोलनकर्त्यांनी सततचा पाठपुरावा केला. तरीही ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५३मध्ये अतिक्रमण काढण्याची स्पष्ट तरतूद असताना नागडे ग्रामपंचायतीने अतिक्र मण काढण्यास टाळाटाळ केली व ग्रामपंचायत आपले कर्तव्य पार पडण्यास असमर्थ ठरली. त्यामुळे नागडे ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हा परिषदेकडे पाठवावा, असा आदेश दिला आहे. (वार्ताहर)