शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
4
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
5
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
8
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
9
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
10
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
13
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
16
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
17
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
18
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
19
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
20
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

आदेशाला तलाठ्याकडून केराची टोपली

By admin | Updated: November 18, 2016 22:21 IST

इगतपुरी : तलाठ्याविरोधात तक्र ारींची दखल घेण्याची मागणी

 इगतपुरी : आदिवासी व्यक्तीच्या जमिनीवरील पिकपाहणी प्रकरणी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला येथील तलाठ्याने कचराकुंडी दाखवून मनमानी करत असल्याची घटना समोर आली आाहे.विशेष म्हणजे एक वर्षभरापूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास अजूनही तलाठी टाळाटाळ करत असून, या कामासाठी आर्थिक मागणी करीत असल्याचा आरोप पीडित आदिवासीने केला आहे. तालुक्यातील तलाठ्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.तालुक्यातील टिटोली येथील (गट क्र मांक २०४) भानुदास श्रावण चिमटे यांच्या मालकीची शेतजमीन आहे. २०१३ मध्ये त्या जमिनीत गावातीलच एका व्यक्तीने पिकपाहणी दावा निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे दाखल केलेला होता. त्या दाव्याबाबत सुनावण्या होऊन निवासी नायब तहसीलदारांनी त्या व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला. म्हणून भानुदास चिमटे या आदिवासी व्यक्तीने निकालाविरोधात इगतपुरी-त्र्यंबकच्या प्रांताधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. प्रांताधिकाऱ्यांनी आवश्यक चौकशी, साक्षी पुरावे, जाबजबाब, महसुली पुरावे, न्यायालयीन निर्णय यांचा अभ्यास करून निवासी नायब तहसीलदारांनी दिलेला आदेश रद्दबातल ठरवीत आदिवासी व्यक्ती भानुदास चिमटे यांचे नाव पिकपाहणी सदरी खुद्द म्हणून लावण्यासाठी आदेश दिला. गेल्या वर्षी या प्रकरणी आदेश होऊन टिटोलीचे तलाठी एस. के. धात्रक यांना आदेशावर अंमल करण्यासाठी कळवण्यात आले. भानुदास चिमटे यांनी स्वत:ही तलाठ्यास आदेशाची प्रत दिली. तथापि, गेल्या वर्षभरापासून तलाठी धात्रक यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सातबारा उताऱ्यावर केलेली नाही. उलट आधीच्या व्यक्तीचे नाव अजूनही तसेच आहे. चिमटे हे मुंबईहून वारंवार या कामासाठी तलाठ्यास भेटतात. परंतु तलाठी धात्रक त्यांना सांगतात की हे काम फार मोठे असून त्यासाठी मोठी रक्कम द्यावी लागेल. वारंवार पाठपुरावा करूनही तलाठी दाद देत नसल्याने ते हतबल झाले आहेत. या प्रकरणी दिवाणी न्यायाधीशांचे अधिकार असणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ फासणाऱ्या तलाठ्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सदर तलाठ्याबाबत सर्वत्र तक्रारी असल्याचे सांगितले जाते. तालुक्यात फेरफार नोंदीचा अंमल न घेणे, नियमित कार्यालयात न येणे, लोकांशी वाद घालणे, नोंदी करण्यास टाळाटाळ करणे आदि गंभीर तक्र ारी नागरिकांनी या तलाठ्याविरोधात केल्या आहेत. तक्र ारी असूनही वरिष्ठ अधिकारी कठोर भूमिका घेत नसल्याने त्यांची मजल आता आदेशांना हरताळ फासण्याकडे झाली आहे. राज्यभर तलाठी संवर्गातील अधिकारी सामूहिक रजेवर असल्याने तलाठी एस. के. धात्रक यांचा संपर्क होऊ न शकल्याने त्यांचे म्हणणे कळू शकलेले नाही.( वार्ताहर)