शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नारंगीची सरशी

By admin | Updated: July 14, 2014 00:31 IST

नारंगीची सरशी

नारंगीची सरशी२० व्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत यजमान ब्राझील आपला उपान्त्य फेरीत झालेला पराभव विसरून निदान तिसरा क्रमांक मिळवून या पराभवाची तीव्रता काही प्रमाणात का होईना कमी करून आपल्या पाठीराख्यांना काहीसा दिलासा देतील, अशी आशा बाळगून पुन्हा एकदा गर्दी करून प्रोत्साहन देणाऱ्या ब्राझीलच्या पाठीराख्यांना मात्र लागोपाठ दुसऱ्या दारुण पराभवाचेच साक्षीदार व्हावे लागले आणि महिनाभर पिवळ्या रंगाची उधळण करणाऱ्या ब्राझीलवासीयांच्या या पिवळ्या रंगावर जर्मनीनंतर केशरी रंगानेही मात केल्यामुळे हा पिवळा रंग चांगलाच फिका पडला. उपान्त्य लढतीत पराभूत झाल्यानंतर या पराभूत संघामध्ये होणाऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीमध्ये बऱ्याच वेळा आपल्या अतिरिक्त खेळाडूंना संधी देऊन या तिसऱ्या क्रमांकाचा सामना खेळला जातो. मात्र सहाव्या विजेतेपदाची आस लावून बसलेल्या तमाम ब्राझीलवासीयांच्या आशेवर पाणी फेरणाऱ्या आपल्या खेळाडूंनी आता शेवट तरी गोड करावा म्हणून हा तिसरा क्रमांकही ब्राझीलसाठी महत्त्वाचा झाला होता. नेदरलॅन्डच्याही धडाकेबाज एक्स्प्रेसला उपांत्य फेरीतच ब्रेक लागला. त्यामुळे त्यांचेही पहिल्या विश्वविजेते बनण्याचे स्वप्न भंगले. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्याला त्यामुळे महत्त्व प्राप्त झाले होते.ब्राझीलची तीच तऱ्हा-: उपान्त्य सामन्यामध्ये दारुण पराभवाची जबाबदारी कर्णधार थिएगो सिल्व्हावर पडली नाही. दोन पिवळ्या कार्डामुळे तो उपान्त्य फेरीतील दारुण पराभवाच्या वेळी बाहेर बेंचवर होता आणि त्याच्यासारखा अनुभवी बचावपटू नसल्यामुळे ब्राझीलचा इतका मोठा पराभव झाला हे चित्र उभे केले जाते. मात्र या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यामध्ये त्याने पुन्हा कर्णधाराचा बॅन्ड हाताला बांधूनही ब्राझीलला तितका मोठा नसला तरीही ३-० म्हणजे काहीसा दारुणच पराभव पत्कारावा लागला. तिसऱ्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचा फाऊल हा सिल्व्हाचाच होता, तर नंतरच्या दोन गोलचे वेळी तोही गोलक्षेत्रातच होता. ब्राझीलचा दुसरा बचावपटू डेव्हिड लुईसही या सामन्यामध्ये सारखा चिडचिड करत होता. त्यामुळे त्याच्याकडून जास्त चुका झाल्या. या सामन्यातील पंच यांच्या पेनल्टीच्या निर्णयावर काहीसे आश्चर्य वाटले. ब्राझीलविरोधात दिलेली पेनल्टीचा फाऊल हा डी च्या बाहेर होता. आॅस्करला डी मध्ये पाडल्यावर ब्राझीलला पेनल्टी न देता उलटे आॅस्करलाच पिवळे कार्ड दिले गेले हा म्हणजे खाईत पडलेल्या ब्राझीलवर वरून दगड मारण्यासारखेच होते. पंचांच्या योग्य निर्णयामुळे कदाचित या सामन्यामध्ये वेगळे चित्रही दिसले असते. अर्थात हा फुटबॉलमधील एक भाग आहे आणि हे गृहीत धरुनच पुढे जावे लागते.रॉबेनची मात्रा पुन्हा सफल-: नेदरलॅन्डचा या विश्वचषकातील प्रवास बघता यावेळी हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे याची चर्चा रंग धरू लागली होती. त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बायन म्युनिक संघाचा आणि नेदरलॅन्डचाही आधारस्तंभ अर्जेन राबेन याची होती. साखळीतील तीन सामन्यांतील नेदरलॅन्डच्या १० गोलमध्ये त्याचे स्वत:चे चार आणि इतर सहा गोलला सहकार्य होते. पेनल्टी मिळवून देण्यात तरबेज असणाऱ्या अर्जेन रॉबेनने मेक्सीकोविरुद्ध उपउउपान्त्यपूर्व सामन्यामध्ये १-१ अशा बरोबरीनंतर शेवटच्या क्षणी पेनल्टी मिळवत नेदरलॅन्डला विजयी केले, तर उपउपान्त्य सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये यशस्वी गोल केला. अर्जेंटिनाविरुद्ध उपान्त्य सामन्यातही पेनल्टीपर्यंत गेलेल्या या सामन्यात पराभूत झालेल्या नेदरलॅन्डच्या दोन यशस्वी पेनल्टीमध्ये एक पेनल्टी रॉबेनची होती. म्हणजे या विश्वचषकामध्ये नेदरलॅन्डला तिसरा क्रमांक मिळवून देण्यामध्ये ९० टक्के वाटा हा अर्जेन रॉबेनचा राहिलेला आहे. कारण या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यामध्येही त्याने धडाकेबाज सुरवात करत तिसऱ्याच मिनिटालाच ब्राझीलच्या डी मध्ये पडून पेनल्टी मिळवली आणि रॉबीन व्हन पर्सीने गोल करत ब्राझीलवर आघाडी घेतली तेथेच पुन्हा काहीसा या सामन्याचा निकाल स्पष्ट झाला. त्यानंतर १७ व्या मिनिटाला ब्राझीलचा बचावपटू डेव्हिड लुईसच्या गचाळ क्लीअरन्सचा फायदा उचलत नेदरलॅन्डच्या डेले ब्लिंडने गोल केला. तर उपांत्य सामन्यामध्ये जर्मनीने जसे वन-टू-थ्री आणि गोल असे करत एकापाठोपाठ गोल केले आणि ब्राझीलचे ४-५ बचावपटू फक्त बघत राहिले. त्याप्रमाणेच नेदरलॅन्डनेही केले. रॉबेनकडे चेंडू सोपवला त्याने तो अंतिम रेषेपर्यंत नेत मायनस केला आणि केवळ गोलमध्ये पुश केला आणि आपला पहिला गोल केला. यावेळीही ब्राझीलचे चार रक्षक आणि गोला सेझार काहीही करू शकले नाही.ब्राझीलला वेगळा विचार करणे आवश्यक :- या विश्वचषकाचे आयोजन करण्यापासूनच पनवती लागलेल्या ब्राझीलच्या विश्वचषकामध्ये आपण चांगली कामगिरी केल्यास सर्व काही सुरळीत होईल. आजही ब्राझीलची जनता फुटबॉलसाठी जान टाकत असली तरी काही नाराज मंडळींचाही राग शांत करता येईल असा विचार करून या विश्वचषकाचे विजेतेपद हाच यावर उपाय आहे. हे लक्षात घेऊन ब्राझीलची यलो सेना प्रयत्न करत होती. या विश्वचषकाच्या एक वर्ष आधी झालेल्या कॉन्फडरेशन कप स्पर्धेतच याची मुहूर्तमेढ रोवली गेली. कॉन्फडरेशन कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यामुळे विश्वास दुणावलेल्या ब्राझीलचे प्रशिक्षक लुईस फिलीप स्कोलरी यांनी रॉबीन्हीओ, काका अशा दिग्गज खेळाडूंना संघातून डच्चू देण्यातही कुचराई केली नाही. परंतु या विश्वचषकाच्या सुरवातीलाच मेक्सिकोने बरोबरी साधून ब्राझीलच्या मर्यादा स्पष्ट केल्या तर बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात जे दोन गोल झाले ते दोन्हीही आघाडीपटूंचे मैदानी गोल नव्हते तर ते कॉर्नर आणि स्पॉट किकवर त्यांच्या बचावपटूंनी केलेले होते. फ्रेड या आघाडीपटूंच्या नावावर केवळ एकच गोल, तर हल्कच्या नावावर तेही नाही, किमान पेनल्टी शूट आउमध्ये तरी त्याने गोल करावा तर तेथेही चिलीविरुद्ध पेनल्टीचा गोल वाया गेला अशा अवस्थेत ब्राझीलने विश्वचषकाचे स्वप्न पहावे हेच काहीसे न पटणारे वाटते आणि आता त्यांना मिळालेला चौथा क्रमांक त्यांच्या गेल्या दोन विश्वचषकांतील कामगिरीपेक्षा वरचा आहे. म्हणजे ब्राझीलची या विश्वचषकातील कामगिरी बरीच म्हणावी लागेल. मात्र यापुढील काळाचा विचार करता ब्राझीलला आता पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी वेगळा विचार करावा लागणार आहे आणि केवळ नेमारसारख्या एकांड्या शिलेदारावर अवलंबून न राहता संघातील सर्वच खेळाडू कसे दर्जेदार असतील यासारखा विचार करावा लागेल.गोल्डन बूट, गोल्डन बॉल, ग्लोव्हजसाठी चुरस : गोल्डन बुटासाठी कोलंबियाचा जेम्स रॉड्रीगेस, जर्मनीचा थॉमस मुल्लर आणि अर्जेंटिनाचा मेस्सी यांच्यामध्ये तर गोल्डन बॉलसाठी मेस्सी, फिलीप लॅम या दोन अंतिम फेरीतील कर्णधाराशिवाय नेदरलॅन्डचा अर्जेन रॉबेन आणि ब्राझीलचा नेमारचाही समावेश आहे. गोल्डन ग्लोव्हजच्या शर्यतीत अंतिम फेरीतील जर्मनचा गोलो मॅन्युएल न्यूएर आणि अर्जेंटिनाचा सर्जीओ रोमेरो यांच्याबरोबरच कोस्टारीकाचा गाली केलोर नवास यालाही स्थान देण्यात आले आहे, तर युवा खेळाडूंमध्ये फ्रान्सचा पॉल पोग्बा आणि राफेल वराने याचबरोबर नेदरलॅन्डचा मोफस डिम्पे यांचा समावेश आहे. या विश्वचषकाच्या अंतिम निकालाबरोबरच या सर्वच पुरस्काराचीही घोषणा होईल तेव्हा या विश्वचषकामधील नवीन स्टारचीही नवी ओळख सर्वांना होईल.