शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

आॅरेंज आर्मीला कर्लचा सहारा

By admin | Updated: July 7, 2014 00:51 IST

आॅरेंज आर्मीला कर्लचा सहारा

आनंद खरे

 

(गोन्सालो हूगायुनच्या गोलच्या आधारे अझ्झुरोंनी बेल्जियमवर मात केली, मात्र आॅरेंज आर्मीला शेवटी बदली गोलकीपर टिम कर्लच्या दोन बचावांनी वाचवले. आता उपांत्य सामन्यात दोन दक्षिण अमेरिकन आणि दोन युरोपियन संघ यांच्यातच या विश्वचषकाचा फैसला होईल)२०व्या विश्वचषकातील पहिल्या दोन उपउपांत्य सामन्याचा निकाल काहीही लागला तरी यामध्ये एक युरोपचा संघ आणि एक दक्षिण अमेरिकेचा संघ उपांत्य फेरीत दाखल होणार होते, त्याप्रमाणे जर्मनी या युरोपच्या संघाने, तर ब्राझीलच्या रूपाने दक्षिण अमेरिकेच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. यानंतरच्या दोन सामन्यांमध्ये दोन अमेरिकन संघविरुद्ध दोन युरोपचे संघ असा सामना असल्यामुळे या दोन उपांत्य सामन्यांमधून दोन्हीही युरोप संघ विजय मिळवितात की दोन्हीही अमेरिकन संघ विजय मिळवतात की एक अमेरिकन संघ आणि एक युरोपचा संघ असे समीकरण तयार होते. या सर्वांची जी चर्चा होती ती या दोन्हीही सामन्यांच्या निकालानंतर स्पष्ट झाले. अर्जेंटिना विरुद्ध बेल्जियम या सामन्यात अर्जेंटिना या संघाने बाजी मारत अमेरिका खंडाचा झेंडा फडकवला, तर नेदरलॅण्ड विरुद्ध कोस्टारिका या सामन्यात नेदरलॅण्डच्या आॅरेंज आर्मीने अमेरिकेच्या कोस्टारिकावर कशीबशी मात करत युरोपचा झेंडाही फडकला. या दोन सामन्यांनंतर उपांत्य फेरीत दाखल होणाऱ्या चार संघांची नावे निश्चित झाली आणि आता या दोन उपांत्य सामान्यांमध्ये पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान ब्राझील या दक्षिण अमेरिकेच्या संघाचा सामना जर्मनी या युरोपच्या संघाबरोबर होणार आहे. तसेच आजच्या दोन उपउपांत्य सामन्यानंतर आता दुसऱ्या उपांत्य सामन्यातही अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेचा संघ आणि नेदरलॅण्ड हा युरोपचा संघ अशी या दोन्हीही खंडांची बरोबरीची लढाई होणार आहे.अर्जेंटिनाशी सरशी : अर्जेंटिना- बेल्जियम या दोन संघांचा विचार करता या दोन संघांमध्ये या आधी चार वेळा आमना सामना झालेला होता. यापैकी अर्जेंटिनाने तीन वेळा, तर बेल्जियमने एक वेळा विजेतेपद मिळवले होते. या स्पर्धेतील या दोन्हीही संघांची आत्तापर्यंतची कामगिरी सारखीच झालेली होती. या दोन्हीही संघांनी आपल्या गटवार साखळीत तीन विजयांसह नऊ गुणांची कमाई करत बाद फेरीत प्रवेश केलेला होता. या दोन्हीही संघांना पहिल्या बाद फेरीच्या पहिल्या उपउपांत्यपूर्ण लढतीत अत्यंत संघर्ष करूनच सामना जिंकता आला होता. दोन्हीही संघांना उपउपांत्य फेरीत प्रवेश करताना अतिरिक्त वेळेत विजय मिळवता आला होता. ही सर्व पार्श्वभूमी बघता या सामन्यात दोघांनाही समान संधी होती, असे म्हटले तर वावगे ठरू नये. मात्र या सामन्याच्या सुरुवातीलाच अर्जेंटिनाला मिळालेली आघाडीच त्यांना शेवटपर्यंत कामास आली. आठव्याच मिनिटाला मेस्सीने आपल्या बाजूच्या मैदानातून चेंडूचा ताबा घेत पुढे चाल करत चेंडू अ‍ॅजेल डी मारिया यांच्याकडे पास केला त्याने तो गोलच्या दिशेने तटवला; परंतु बेल्जियमचा बचावपटूच्या पायाला लागल्याने चेंडूी दिशा बदलली आणि तो डी मध्ये असलेल्या गोन्सालो हुगायनकडे आला त्या नेता चेंडू न आडवता तसाच उजव्या पायाने जोरदारपणे गोलच्या उजव्या कोपऱ्यात मारून अर्जेंटिनाला आघाडीवर नेले. आणि हीच आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत २४ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.टीम कर्लच्या बचावामुळे नेदरलॅण्डच्या आॅरेंज आर्मीचा बचाव :- उपउपांत्य फेरीच्या शेवटच्या सामना नेदरलॅण्ड आणि कोस्टारिका यांच्यात झाला. या दोघांचीही विश्वचषकातील कामगिरी बघता नेदरलॅण्डने तीन वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठलेली होती. तर कोस्कारिकाची सरस कामगिरी म्हणजे केवळ चार विश्वचषकात खेळणाऱ्या कोस्टारिकाने एक वेळेस पहिल्या १६ मध्ये स्थान मिळविले आहे. तसेच या विश्वचषकातील कोस्टारिकाची कामगिरी बघता त्यांनी आपल्या गटात इंग्लंड, उरुग्वे आणि इटली या तीन माजी विश्वविजेत्यांना घरी पाठविण्याची कामगिरी केली आणि उपउपांत्यपूर्व फेरीत संयमाचा नमुना पेश करत पाचही पेनल्टी मारम ग्रीसवर मात केली होती. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या सामन्यात नेदरलॅण्डचे पारडे काहीसे जड वाटत होते. मात्र कोस्टारिकाने नेदरलॅण्डच्या दिग्गज खेळाडूंचा अजिबात दबाव न घेता निकराने खेळ करत प्रथम पहिली निर्धारित ९० मिनिटे आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेची १५-१५ मिनिटेसमर्थपणे किल्ला लढवत आॅरेंज आर्मीच्या तोंडचे पाणी पळवले. खरतर या १२० मिनिटांच्या खेळात वर्चस्व हे नेदरलॅण्डचेच होते चेंडूचा ताबा जास्त काळ (६५टक्के) आपल्याकडे ठेवणाऱ्या आँरेंज आर्मीने वारंवार हल्ले करत गोल करण्याचे प्रयत्न केले. त्यांना यादरम्यान ११ कॉर्नर्स मिळाले. अर्जेन रॉबेनने नेहमीप्रमाणे अनेक चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या. रॉबीन व्हॉन पर्सीला काही चांगले चान्स मिळाले, मात्र त्याला फिनिशिंग टच त्यांना देता येत नव्हता. यादरम्यान तो अनेकवेळा आॅफ साइडही पकडला गेला. अर्थात कोस्टारिकाचा गोली कोलरार नवास याने प्रत्येक वेळी अप्रतिम बचाव करत आपल्या संघाला वाचवले हेदेखील महत्त्वाचे होते. नेदरलॅण्डच्या वेल्सी स्नायडरची एक फ्री कीक आणि एक शॉट हे पोलला लागून परत आले. हे पहाता आॅरेंज आर्मीचे आजकाही लक नाही असेच वाटत होते, अन्यथा किमान २-३ गोलने त्यांनी निर्धारित वेळेतच सामना संपवला असता. कोस्टारिकाने बचाव करतानाच काही मोजकेच हल्ले केले. त्यांचा अतिरिक्त वेळेतील शेवटच्या काही मिनिटांमध्ये पहिला कॉर्नर मिळाला. त्याचा शेवटचा हल्ला खतरनाक होता. तो एकमेव हल्ला नेदरलॅण्डचा गोली जेस्पर केलीसनने चांगला अडवला अन्यथा उलटे चित्र बघायला मिळाले असते. अर्थात कोस्टारिकाचा प्रयत्न सामना पेनल्टीपर्यंत नेण्याचाच होता, कारण या आधीच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात याच पेनल्टीने त्यांना ग्रीसवर विजय मिळवून दिला होता. अखेर कोस्टारिकाने सामना पेनल्टीपर्यंत नेलाच. या आधीच्या सामन्यांप्रमाणे पाचही पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी झालेल्या कोस्टारिकाला मात्र यावेळी तीच कामगिरी यावेळी करता आली नाही. नदरलॅण्डचे प्रशिक्षक यांनी सामना पेनल्टीकडे जातो आहे हे बघितल्यावर अगदी शेवटच्या मिनिटाला आपला दुसरा उंचपुरा गोली टिम कर्ल याला मैदानात उतरवून जी खेळी केली तिही त्यांना यावेळीही साथ देऊन गेली. मागील सामन्यात त्यांनी चक्क कर्णधार आणि महत्त्वाचा खेळाडू रॉबीन व्हान पर्सी याला शेवटची २५ मिनिटे बाहेर काढून हंटलरला खेळवले ही चाल यशस्वी करत हंटलरने पेनल्टीवर गोल करत नेदरलॅण्डला विजयी केले होते. त्याचप्रमाणे त्यांचा हा गोलीचा बदलही यशस्वी ठरला आणि खेळामध्ये प्रशिक्षकाची भूमिका किती महत्त्वाची असते आणि प्रशिक्षकाचा एक निर्णय कसा संघाला विजय मिळवून देता याचाही प्रत्यय आला. कोस्टारिकाच्या बोर्गास, गोन्झालेस आणि ख्रिश्चन बोलोनोस यांची पेनल्टी गोलमध्ये मारल्या मात्र कर्णधार बायन रुटस आणि मायकल बेरेंटेज यांच्या पेनल्टी नेदरलॅण्डचा बदली गोली कर्लने आडवल्या आणि तोच सामन्याचा हीरो ठरला. नेदरलॅण्डकडून रॉबेन व्हॅन पर्सी, अर्जेन रॉबेन, वेलल्सी स्नायडर आणि केयुट यांनी पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून हा १० मिनिटांचा क्लायमॅक्स संपवला.आता उपांत्य फेरीची प्रतीक्षा : आता केवळ उपांत्य आणि तिसऱ्या क्रमांक आणि अंतिम सामना असे चारच सामने शिल्लक आहेत. यामधील उपांत्य सामन्यांचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर ८ जुलैपासून या दोन उपांत्य सामन्यांचा थरार सुरू होईल. आणि सुरवातीला बराच उलटफेर झाल्यानंतरही आता चारही माजी विजेतेच आता या २०व्या चषकासाठी एकमेकांचा मुकाबला करणार आहे. त्यामुळे सर्वच दिग्गज संघांची ही लढाई या स्पर्धेचा अत्युच्च बिंदू गाठणार यात काही शंकाच नाही.