शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या ‘काथा’साठी महाराष्टÑाच्या वनसंपदेला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:16 IST

नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या महाराष्टÑातील आदिवासी क्षेत्राला ग्रहण लागले आहे. नजीकच्या गुजरात राज्यात असलेल्या गुटख्यासाठी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात थेट शिरकाव करून गुजरातमधील तस्कर खैराच्या वृक्षांची कत्तल करीत आहेत. त्यामुळे ही वनसंपदा धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांतील वनखात्यांना ही चोरटी तूट आणि तस्कारी रोखण्यात अपयश आले आहे.

अझहर शेख ।नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या महाराष्टÑातील आदिवासी क्षेत्राला ग्रहण लागले आहे. नजीकच्या गुजरात राज्यात असलेल्या गुटख्यासाठी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात थेट शिरकाव करून गुजरातमधील तस्कर खैराच्या वृक्षांची कत्तल करीत आहेत. त्यामुळे ही वनसंपदा धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांतील वनखात्यांना ही चोरटी तूट आणि तस्कारी रोखण्यात अपयश आले आहे.  गुजरात राज्यातील वापीसह अनेक मोठ्या शहरांच्या औद्योगिक वसाहतींमध्ये गुटखा तयार करण्याचे कारखाने सुरू आहेत. गुटख्यामध्ये लाल रंग येण्यासाठी काथ वापरला जातो; मात्र त्यासाठी खैर लागत असतो. महाराष्टÑात आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नाशिक जिल्ह्णातील पेठ- सुरगाणा या आदिवासी क्षेत्रात पूर्व- पश्चिम वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून त्यात खैराचे वृक्षही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे महाराष्टÑाच्या वन संपत्तीत घुसखोरी करून खैर तस्करांची मोठी टोळी खैराच्या वृक्षांची कत्तल करीत आहे. त्यासाठी तस्कर ‘कटर’ चालवत असल्याचे वृत्त असून, वनविभागाने त्याला दुजोरा दिला आहे. चोरट्यांना अटक करण्यासाठी वनखात्याकडून प्रयत्न केले जात असले तरी गुजरातमधील पोलीस किंवा वनविभागाकडून फारसे सहकार्य मिळत नसल्याचे ‘रॅकेट’च्या मुळाशी पोहचण्यास अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले.  तस्करांनी अगोदरच सीमेवरील गुजरातमधील खैराची वृक्षसंपदा नष्ट केली आहे आणि आता त्यांची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली आहे. वनविभागापुढे गुजरातच्या खैर तस्करांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी वनविभागाच्या पूर्व व पश्चिमच्या अधिकाºयांनी सुरगाणा, पेठ वनपरिक्षेत्रात स्थानिक गावांचे सरपंच, पोलीस पाटील तसेच पाड्यांवरील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांच्या मदतीने नागरिकांत जनजागृती सुरू करत जंगलाचे महत्त्व व सुरक्षा पटवून देण्यास प्रारंभ केला आहे. एकीकडे राज्यात पर्यावरण दिनी कोटी कोटी झाडे लावण्याचा विक्रम केला जात असताना दुसरीकडे मात्र, अस्तित्वातील वनसंपदा धोक्यात येत असल्याने वनमंत्र्यांचा उद्देश कितपत सफल होईल, याविषयी शंका निर्माण झाली आहे.गुजरातशी संबंधित टोळीगुजरातच्या सीमेवरून महाराष्टÑातील नाशिकच्या सुरगाणा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत घुसखोरी करून खैरची कत्तल करणाºया तस्कराच्या मुसक्या आवळण्यास वनविभागाच्या गस्त पथकाला  काही दिवसांपूर्वी यश आले. त्यांच्याकडून मिळालेली माहिती  अत्यंत धक्कादायक असून ‘खैर’ तस्करीचे मोठे रॅकेट नाशिक वनविभागाच्या गुजरात सीमेच्या जवळ असलेल्या आदिवासी तालुक्यांच्या वनपरिक्षेत्रात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे.सुरगाणा वनक्षेत्रातील वनकर्मचाºयांच्या गस्त पथकाने लाकूड तस्कर टोळीमधील सराईत गुन्हेगार संशयित गणेश मोतीराम वाघमारे (रा. खुंटविहीर, ता. सुरगाणा) यास उंबरपाडा वनउपज नाक्यावर अटक केली. दिंडोरी न्यायालयाने सुनावलेल्या वनकोठडीत वाघमारे याची चौकशी केली असता त्याने साग व खैर वृक्षाची कत्तल करून तस्करीसाठी गुजरातच्या तस्कर टोळीला मदत केल्याचे उघड झाले. एकूणच गुजतरातच्या खैर तस्कर टोळीचे आदिवासी भागात ‘संबंध’ असल्याचे स्पष्ट आहे.