शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
5
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
6
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
7
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
8
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
9
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
10
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
11
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
12
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
13
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
14
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
15
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
16
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
17
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
18
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
19
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
20
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!

जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:09 IST

कळवण तालुक्यातील पुनंद धरणातून सटाण्यातील जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध होत असून, यासाठी शनिवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. सटाणा पालिकेला पाणी देण्यास व जलवाहिनी टाकण्यास कळवण तालुका व पुनंद खोºयातील शेतकºयांचा तीव्र विरोध असून, शनिवारी पिळकोस, विसापूर, भादवण, बिजोरे, खामखेडा, सावकी, चाचेर यांसह सुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, सरपंच, सोसायटी सभापती, तरुण शेतकरी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येत शेतकरी मेळावा घेतला.

पिळकोस : कळवण तालुक्यातील पुनंद धरणातून सटाण्यातील जलवाहिनीला पाणी देण्यास विरोध होत असून, यासाठी शनिवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. सटाणा पालिकेला पाणी देण्यास व जलवाहिनी टाकण्यास कळवण तालुका व पुनंद खोºयातील शेतकºयांचा तीव्र विरोध असून, शनिवारी पिळकोस, विसापूर, भादवण, बिजोरे, खामखेडा, सावकी, चाचेर यांसह सुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, सरपंच, सोसायटी सभापती, तरुण शेतकरी, लोकप्रतिनिधींनी एकत्र येत शेतकरी मेळावा घेतला.या मेळाव्यात मानूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य भारती पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, तालुकाध्यक्ष रामकृष्ण जाधव, शांताराम जाधव, सखाराम वाघ, मोहन जाधव, अण्णा शेवाळे, बाजीराव गुंजाळ, प्रवीण रौंदळ, दादाजी बोरसे यांनी उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन केले. दरम्यान, रक्त सांडावे लागले तरी चालेल पण परिसरातील एकही शेतकरी आपल्या शेतातून सटाणा शहरासाठी जाणारी पाइपलाइन खोदू देणार नाही, अशी शपथ सर्व शेतकºयांनी घेतली. जलवाहिनीला विरोध करण्यासाठी पुनंद सुळे कालवा संघर्ष कृती समितीचे गठन करण्यात आले. बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. जलवाहिनीस परिसरातील सर्व गावांचा व शेतकºयांचा विरोध असून, स्थापन करण्यात आलेल्या समितीला पाठिंबा दर्शविण्यात आला. सटाणा शहरवासीयांचा नैसर्गिक हक्क हा केळझर धरणावर असून, त्यांना कळवण तालुक्यातील धरणातील पाणी हे पाइपलाइनद्वारे कदापिही जाऊ दिले जाणारनाही. यासाठी शेतकरी शेतात पाइपलाइन खोदू देणार नाहीत. जर शासनाला सटाणा शहरवासीयांना पाणी द्यायचे असल्यास ते कालव्याद्वारे किंवा नदीद्वारे द्यावे, अशी भूमिका शेतकºयांनी मांडली आहे. अन्यथा आज या आंदोलनाची ठिणगी पडली आहे त्या ठिणगीचे आगीत रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा यावेळी शेतकºयांनी दिला आहे. याविरोधात आंदोलना स शेतकºयांनी तयार रहावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी आपल्या मनोगतात यावेळी सांगितले. यावेळी पुनद डावा कालव्यावर अवलंबून असलेल्या गावातील शेतकºयांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव ,शांताराम जाधव,आण्णा शेवाळे यांनी या लढाची पुढील आखणी केली असून येत्या १५ आॅगस्ट ला या कालव्यावर अवलंबून असलेल्या गावातील ग्रामपंचायत ,सोसायटी व विविध संघटनांचे ठराव केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी व शासनदरबारी याचा पाठपुरावा करण्यासाठी पुनद दावा कालवा संघर्ष समतिी गठन करून मोहन जाधव , सखाराम वाघ ,कारभारी पवार ,बाजीराव गुंजाळ , प्रल्हाद गुंजाळ रवींद्र गुंजाळ, दीपक गुंजाळ, हेमंत गुंजाळ ,या तरु ण शेतकº्यांची या समितीवर नेमणूक करण्यात आली आहे.