सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको भागातील मध्यवस्तीत असणाऱ्या देशी दारू दुकानाला विरोध सुरू असतानाच आज माउली लॉॅन्स डीजीपीनगर येथील रहिवासी भागात सुरू होण्याआधीच वाइन शॉपलाही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला.सरकारने महामार्गावरील पाचशे मीटर अंतरावरील हॉटेल तसेच दारू दुकानांना बंदी घातली असून, यामुळे नागरी भागात ही दारू दुकाने स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे आता नवीन भागात सुरू होणाऱ्या दुकानांना देखील विरोध होऊ लागला आहे. रविवारी सिडकोतील डीजीपीनगर माउली लॉन्स येथील रहिवासी भागात वाइन शॉप सुरू होणार असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाल्याने त्यांनी याबाबत प्रभागाचे नगरसेवक सुवर्णा मटाले व दीपक दातीर यांनी कळविले. त्यांनीही लगेचच त्यास विरोध केला. यामुळे शेकडो स्थानिक नागरिकांनी बंद असलेल्या दुकानासमोरच आंदोलन करण्यास सुरुवात केली. काही वेळातच पोलीस अधिकारी पोहचले. येत्या सोमवारी याबाबत अंबड पोलिसांना निवेदन देण्यात येणार असून, यानंतर येथे वाइन शॉप सुरू झाल्यास नागरिकांना आंदोलनाचा इशाराही यावेळी दिला.(वार्ताहर)
वाइन शॉप सुरू करण्यास विरोध
By admin | Updated: May 1, 2017 01:42 IST