शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महापालिका शाळांच्या विलीनीकरणास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:42 IST

महापालिकेच्या शाळांची पडताळणी करण्यात आल्यानंतर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि पटावरील विद्यार्थ्यांची संख्या यात तफावत आढळून आल्याने एकूण ३७ शाळांचे जवळच्याच मनपाच्या शाळांमध्ये विलीनीकरण करण्याच्या निर्णयास लोकप्रतिनिधींसह मुख्याध्यापकांकडून्ही विरोध प्रकट होऊ लागला आहे. त्यामुळे शिक्षण विभाग पेचात सापडला आहे.

नाशिक : महापालिकेच्या शाळांची पडताळणी करण्यात आल्यानंतर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि पटावरील विद्यार्थ्यांची संख्या यात तफावत आढळून आल्याने एकूण ३७ शाळांचे जवळच्याच मनपाच्या शाळांमध्ये विलीनीकरण करण्याच्या निर्णयास लोकप्रतिनिधींसह मुख्याध्यापकांकडून्ही विरोध प्रकट होऊ लागला आहे. त्यामुळे शिक्षण विभाग पेचात सापडला आहे. विलीनीकरणामुळे सुमारे ९०० हून अधिक विद्यार्थिसंख्या असलेल्या ११ शाळांमध्ये कशा प्रकारे व्यवस्था लावायची याबाबतही अडचण निर्माण झाली आहे.  महानगरपालिका नाशिक शिक्षण विभागाच्या १०९ मराठी, ४ हिंदी व १३ उर्दू माध्यमांच्या एकूण १२६ शाळा आहेत. सदर शाळांमध्ये एकूण २९ हजार विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहेत. एकूण ९४० शिक्षक अध्यापनाचे कामकाज करत आहेत. या शाळांची गेल्या काही दिवसांपासून शिक्षण विभागामार्फत पडताळणी सुरू होती. या पडताळणीत काही शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थिती, पटावरील विद्यार्थ्यांच्या प्रमाणात तफावत आढळून आली. शासन निकषानुसार इयत्ता पहिलीचा वर्ग असलेल्या दोन शाळांमधील अंतर किमान एक कि.मी. असणे आवश्यक आहे.  तथापि, महानगरपालिकेच्या काही शाळा त्यापेक्षा कमी अंतरात किंवा एकाच आवारात असल्याने विद्यार्थी पट व उपस्थिती यात तफावत आढळून आली. शासन निकषानुसार ३० विद्यार्थ्यांच्या प्रमाणात एक शिक्षक देय आहे.शालेय इमारत व पुरेशा वर्गखोल्या उपलब्ध असताना वेगवेगळ्या ठिकाणी शाळा भरविणे विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करता संयुक्तिक ठरत नसल्याचेही लक्षात आले. त्यामुळे शाळेतील पटावरील विद्यार्थी, प्रत्यक्ष उपस्थिती, शिक्षक व विद्यार्थ्यांचे गुणोत्तर प्रमाण, उपलब्ध इमारती व वर्गखोल्या, दोन शाळांमधील असलेले प्रत्यक्ष अंतर लक्षात घेऊन सर्व १२६ शाळांमधील कमी पट व अल्प उपस्थितीच्या शाळांचे जवळच्या अथवा त्याच आवारातील अस्तित्वातील शाळेमध्ये विलीनीकरण करून शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार शिक्षण विभागाच्या एकूण ३७ शाळा जवळच्या किंवा त्याच आवारातील शाळेत विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची आता १ मेपासून अंमलबजावणी करण्याची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली असतानाच, विलीनीकरणास त्या-त्या भागातील नगरसेवकांकडून विरोध होऊ लागला आहे. याशिवाय, संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनीही आपला विरोध प्रकट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, शिक्षण विभागापुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत.एक परिसर, एक इमारत, एक शाळामहापालिका आयुक्तांनी एक परिसर, एक इमारत आणि एक शाळा असे धोरण आखले आहे. त्यानुसारच शिक्षण विभागाने पडताळणी केल्यानंतर ३७ शाळांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यातील ११ शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या ९०० हून अधिक असल्याने त्या दुसऱ्या परिसरातील शाळांच्या इमारतीत कशाप्रकारे विलीन करायच्या याबाबतचा पेच निर्माण झाला आहे. त्यात प्रामुख्याने मनपा शाळा क्रमांक ३६ ही विद्यानिकेतन १४ मध्ये, मनपा शाळा क्रमांक ४५ ही शाळा क्रमांक ६५ मध्ये, शाळा क्रमांक ६९ ही शाळा क्रमांक ७० मध्ये, शाळा क्रमांक ७४ ही शाळा क्रमांक ९४ मध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव आहे. या विलीनीकरणास त्या-त्या भागातील स्थानिक नगरसेवकांनी विरोध सुरू केला आहे.

टॅग्स :municipal schoolमहापालिका शाळा