शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा भागातील दारू दुकानाला विरोध

By admin | Updated: July 15, 2017 00:14 IST

नाशिक : वडाळा भागातील रविशंकर मार्गावरील महादेव पार्क इमारतीच्या तळमजल्यावर अलीकडेच ‘महाराणी वाइन शॉप’ सुरू करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वडाळा भागातील रविशंकर मार्गावरील महादेव पार्क इमारतीच्या तळमजल्यावर अलीकडेच ‘महाराणी वाइन शॉप’ सुरू करण्यात आले असून, या दुकानामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांसह साधू-महंतांनी केली आहे.  तीन आठवड्यांपूर्वी सदरचे दुकान सुरू करण्यात आले असून, या संदर्भात रहिवाशांनी उपनगर पोलीस ठाणे, पोलीस उपायुक्त तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केल्या परंतु त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने महादेव पार्क इमारतीतील रहिवाशांनी त्र्यंबकेश्वरचे बिंदू महाराज यांच्याकडे तक्रार केली. त्यावर शुक्रवारी बिंदू महाराज, स्वामी सागरानंद आदी महंतांनी स्थानिक नागरिकांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या दुकानामुळे परिसरातील महिला, तरुणी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, या दुकानाजवळच दोन मंदिरे असून, महिलांचे सभागृह तसेच हॉस्पिटलदेखील आहे. या दुकानाला परवानगी देताना धार्मिक स्थळे, आरोग्य केंद्रांचा विचार करण्यात आलेला नाही. दुकान सुरू करण्यासाठी सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत. या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या भावनांचा विचार करता सदरचे दुकान तत्काळ बंद करण्यात यावे अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महंत दीपानंदजी सरस्वती, मेघा थूल, सुशीला जाधव, शीतल अढांगळे, मटिल्डा डिसूजा, वैशाली दारोळे, सरिता चौरे, राजकन्या पटेल आदी नागरिक उपस्थित होते. नवीन दुकाने रडारवरराष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आल्यानंतर दुकानदारांनी शहरी भागाकडे आपला मोर्चा वळविला असला तरी, शहराच्या मध्यवस्तीत वाइन शॉप सुरू करण्यास स्थानिक नागरिक विरोध करू लागले आहेत. तिडके कॉलनीतील लंबोदर अव्हेन्यू इमारतीतील रहिवाशांप्रमाणे पेठरोडला मोती मार्केटच्या नागरिकांनीही विरोध दर्शविला. त्यापूर्वीही सिडको, सातपूर व पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड भागातील नागरिकांनी आंदोलने करून दुकाने बंद केली आहेत. आता त्यात महादेव पार्कची भर पडली आहे.