शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

गोविंदनगरमधील उद्यानाचे आरक्षण उठविण्यास विरोध

By admin | Updated: August 4, 2015 00:17 IST

एकमेव आरक्षण : सहसंचालकांना निवेदन

नाशिक : गोविंदनगर परिसरातील सर्व्हे नंबर ७७७ व ७८५ पैकी जागेतील आरक्षण क्रमांक ३५८ क मधील सुमारे २० एकर जागा उद्यानासाठी आरक्षित असताना प्रारूप विकास आराखड्यात सदर आरक्षण उठविण्यात येऊन क्षेत्र रहिवासी भागात समाविष्ट करण्यास महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेता व सेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी विरोध दर्शविला असून, त्यासंबंधी नगररचनाचे सहसंचालकांना निवेदन सादर केले आहे.सुधाकर बडगुजर यांनी याबाबत हरकत घेतली असून त्यात म्हटले आहे, नाशिक शिवारातील सर्व्हे नंबर ७५८ ते ८०४ ते ९५५ या सर्व्हे नंबर अंतर्गत सिडको वसाहतीला लागून एकूण ३१७ हेक्टर (७९२ एकर) एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाकरिता १९९३ च्या विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक ३५८ क ही जागा उद्यानासाठी आरक्षित करण्यात आलेली होती. सदर भागात हे एकमेव आरक्षण होते. परिसरातील संपूर्ण क्षेत्रफळाचा विकास झालेला असताना सदर आरक्षित जागेत उद्यान विकसित करणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार महापालिकेकडे भूसंपादनाचा प्रस्तावही कार्यरत होता. मात्र, प्रारूप सुधारित विकास आराखड्यात सदर उद्यानाचे आरक्षण रद्द करून ती जागा रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहे. सदर आरक्षण उठविण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. आरक्षण उठविण्याची ही कृती संभ्रमावस्था निर्माण करणारी असल्याचे बडगुजर यांनी म्हटले आहे. यावेळी सहायक संचालक किशोर पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. पंकज देवरे, डॉ. विनोद चौधरी, डॉ. गिरीश औताडे, डॉ. मिलिंद पिंपरीकर, डॉ. सतीश पाटील, डॉ. राजेश सोनवणे, संतोष हरगोडे, धनंजय बुचडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)