शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तालुक्याबाहेरील कोरोना रुग्ण ठेवण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:47 IST

चांदवड : येथील कोरोना कोविड सेंटरमध्ये तालुक्याबाहेरचे कोरोना रुग्ण ठेऊ नये अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे चांदवड येथील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे केली असून या घटनेला तीव्र विरोध दर्शविला आहे. तर चांदवड नगरपरिषदेने याबाबत एका ठरावाद्वारे विरोध केला आहे.

चांदवड : येथील कोरोना कोविड सेंटरमध्ये तालुक्याबाहेरचे कोरोना रुग्ण ठेऊ नये अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे चांदवड येथील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे केली असून या घटनेला तीव्र विरोध दर्शविला आहे. तर चांदवड नगरपरिषदेने याबाबत एका ठरावाद्वारे विरोध केला आहे.या शिष्टमंडळात उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, राष्टÑीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव,समाधान जामदार, नगरसेवक जगन्नाथ राऊत, अल्ताफ तांबोळी, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रकाश शेळके,रिजवान घासी, सुनील कबाडे, अन्वर शहा, भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, मनसेचे नितीन थोरे, नाना विसपुते, मतीन घासी, सागर बर्वे, अ‍ॅड. नवनाथ आहेर, मुकेश आहेर, गणेश महाले, नितीन फंगाळ आदिसह असंख्य कार्यकर्ते व नेत्यांचा समावेश होता.या निवेदनात म्हटले आहे की, चांदवड शहरामध्ये श्री नेमिनाथ जैन संस्थेचे श्रीमान आर.पी.चोरडीया या हॉस्पीटलमध्ये कोव्हीड -१९ या आजाराचे पॉझटिव्ह रुग्ण ठेवले जातात तसेच ‘‘डांगसौंदाणे येथील कोविड सेंटर चांदवडला स्थलांतरीत ’’अशा प्रकारचे वृत्त दै.लोकमत मध्ये प्रसिध्द झाले आहे. यावरून या ठिकाणी चांदवड तालुक्यातील रुग्णांच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून म्हणजेच मालेगाव, लासलगाव, देवळा, कळवण, सटाणा इत्यादी ठिकाणाचे रुग्ण या हॉस्पीटल मध्ये आणु नये व असा कुठलाही निर्णय घेण्यात येवू नये. तसेच चांदवड शहरातील हॉस्पीटलमध्ये पुरेशी सेवा उपलब्ध नाही व या हॉस्पीटलमध्ये रुग्ण ठेवण्याची क्षमता कमी असल्याने या ठिकाणी अधिक रुग्ण ठेवण्यात येवू नये. सदर रुग्ण जिल्ह्याच्या अद्यावत अशा मोठ्या हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात यावे.१५ जुनपासून श्री. नेमिनाथ जैन संस्थेत शाळा व कॉलेज सुरु करण्याबाबतचे धोेरण शासनाचे असून तसे झाल्यास या नेमिनाथ जैन कॅम्पसमध्ये सुमारे १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांच्यामध्ये कोरोना बाधा होण्याची शक्यता असून त्यासाठी शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. तरी बाहेर गावातील पॉझटिव्ह रुग्ण ठेवण्यात येवू नये. असा उल्लेख निवेदनात नमुद केला आहे.-----------------------------नगरपरिषदेत स्थायी समितीच्या सभेत ठराव४चांदवड नगरपरिषद चांदवड स्थायी समितीची सभा नुकतीच घेण्यात आली.त्यात चांदवड येथील कोविड सेंटरमध्ये तालुक्याबाहेरील रुग्ण ठेऊ नये असा तीव्र विरोध दर्शविणारा ठराव नगरसेवक जगन्नाथ राऊत यांनी मांडला त्यास उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी अनुमोदन दिले यावेळी नगराध्यक्ष रेखा गवळी, नगरसेवक अशपाक इसाकखान, अल्ताफ तांबोळी, बाळु वाघ, शालिनी भालेराव, इंदुबाई वाघ, नवनाथ आहेर, कविता उगले, सुनीता पवार, रविंद्र अहिरे, मीनाताई कोतवाल, देवीदास शेलार, जयश्री हांडगे, लिलाबाई कोतवाल, पार्वतीबाई पारवे, प्रविण हेडा, राजकुमार संकलेचा आदिच्या सह्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक