शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप करण्यास विरोध

By admin | Updated: September 5, 2015 21:51 IST

शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप करण्यास विरोध

येवला : संस्थाचालक-शिक्षकांकडून निषेध,गटशिक्षणाधिकारी यांना निवेदनयेवला : खासगीकरणाच्या रेट्याखाली केंद्र व राज्यशासन त्यापुढे झुकत असून शिक्षण क्षेत्रात मनमानी हस्तक्षेप करीत आहे. याचे घातक परिणाम शिक्षणावर होत आहे. याचा तीव्र शब्दात निषेध येवला तालुक्यातील संस्थाचालक व शिक्षकांनी केला.येवला तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत व सहायक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे व गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांना निवेदन दिले. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता तालुक्यातील शिक्षण संस्थाचालक, शिक्षण प्रेमी नागरिक व शिक्षक पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर जमले. शासनाच्या शिक्षणविषयक बाजारीकरण करणाऱ्या धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, जे.पी नाईक यांनी पुरोगामी विचार रु जवलेल्या महाराष्ट्रात शिक्षणाचे भवितव्य चिंताजनक बनत चालले आहे. यावर संघटित लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पंकज पारख यांनी केले. यावेळी समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी शासनाच्या शिक्षणविषयक धोरणावार टीका केली. निवेदनाचे वाचन माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तकुमार उटावळे यांनी केले. शिक्षक फेडरेशनचे सदस्य दत्ता महाले यांनी शासन दररोज काढीत असलेली परिपत्रके व त्याचा शिक्षणाचे धोरणावर होत असलेल्या दूरगामी परिणामाबाबत चिंता व्यक्त केली. अनेक अडचणींचा विचार शिक्षणविषयक धोरण ठरवताना शासन विचार करणार आहे की नाही अथवा शिक्षणविषयक सुधारणा केवळ घोषणाबाजीचा फार्स तर नाही? असा सवाल किरण परदेशी यांनी उपस्थित केला.निवेदनात शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सात टक्के खर्च केला पाहिजे, शाळांना बारा टक्के वेतनेतर अनुदान द्यावे, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये, शिक्षक शिक्षकेतर भरती शिक्षणसंस्थेकडेच ठेवावी आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. या निषेध आंदोलनात रामदास कहार, गणपत गायकवाड, किशोर जगताप, पुष्पा गुप्ता, चंपा रणदिवे, लता लिमजे, बाळासाहेब सोमासे, भाऊसाहेब मगर, राजेंद्र पाखले, दिलीप पाखले, कानिफ मढवई, पुंडलिक सोनवणे, शिवाजी शिंदे यांचेसह संस्थाचालक, शिक्षक सहभागी झाले होते. (वार्ताहर)