शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीविरोधात माकपा आक्रमक महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:53 IST

सिडको : महापालिकेच्या प्रस्तावित घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात शनिवारी माकपाच्या वतीने महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देयापुढील काळात माकपा आक्रमक भूमिका घेणार नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त

सिडको : महापालिकेच्या प्रस्तावित घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात शनिवारी माकपाच्या वतीने महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर विभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. मनपाने अवास्तव दरवाढ मागे घ्यावी अन्यथा यापुढील काळात माकपा आक्रमक भूमिका घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. माकपाच्या वतीने आज मोर्चा काढून करवाढीच्या विरोधात मनपाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी अशी घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करण्याची तयारी सुरू केली असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी पक्षाकडून सर्वसामान्य नाशिककर, कष्टकरी कामगार व स्वयंरोजगार करणारे, चाकरमाने अशा सर्वांवरच अन्यायकारक करवाढ लादली जाणार असून, नागरिकांची दिशाभूल करण्यात आली असल्याचा आरोपही माकपाच्या वतीने करण्यात आला आहे. या मोर्चात माजी नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे, दिनेश सातभाई, संतोष काकडे, प्रा. व्यंकट कांबळे, तुकाराम सोनजे, संदीप आहेर, दीपक गहिवाल, विजया टिक्कल, अनिल भागवत, प्रभाकर वाहुळे, सुशीला आहेर, रत्नमाला सोनजे आदी सहभागी झाले होते.