शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनास विरोध

By admin | Updated: May 30, 2017 00:49 IST

भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव आणला असता, विरोधकांनी अभिनंदनाचा नव्हे तर त्यांच्या स्वागताचा ठराव करण्याची सूचना केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेत रविवारी (दि.२८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतून महापालिकेचा अपेक्षाभंग झाल्याने सोमवारी (दि.२९) अंदाजपत्रकीय सभेत विरोधकांनी भाजपाला खिजवण्याची संधी सोडली नाही. भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव आणला असता, विरोधकांनी महापालिकेला काहीच मिळाले नसल्याने अभिनंदनाचा नव्हे तर त्यांच्या स्वागताचा ठराव करण्याची सूचना केली. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी महापालिकेसाठी भरघोस निधी देण्याचे मान्य केले असल्याचे महापौरांना वारंवार सभागृहाला सांगावे लागत बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. अंदाजपत्रकीय महासभेत स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महापालिकेला भरघोस निधी देण्याचे मान्य केल्याने त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणला. महापौरांकडून अभिनंदनाचा ठराव आणल्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले मात्र, विरोधकांनी त्यास आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्र्यांकडून काहीही ठोस मिळाले नसल्याचे सांगत स्वागताचा ठराव करण्याची सूचना केली, तर राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनीही मुख्यमंत्र्यांनी नेमके काय दिले हे सभागृहाला सांगण्याची विनंती केली व ठरावास पक्षाचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी महापौर रंजना भानसी यांनी मुख्यमंत्र्यांनी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगत सभेचे कामकाज सुरू केले. परंतु, नंतर विरोधी सदस्यांकडून मुख्यमंत्री भेटीचा उल्लेख भाषणात येत गेला आणि भाजपाला खिजवण्याची संधी साधण्यात आली. माजी उपमहापौर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे स्वागत केले परंतु, या बैठकीसाठी प्रत्येक नगरसेवकाला सन्मानाने निमंत्रित करण्याची गरज होती, असे सांगितले. शेवटी महापौर रंजना भानसी यांनी बैठकीचा वृत्तांत थोडक्यात कथन करत मुख्यमंत्र्यांनी काही पॅकेज जाहीर करण्याऐवजी शहराच्या गरजा ओळखून प्रस्ताव सादर करण्याचे व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असल्याचे सांगितले.