नाशिकरोड : परिसरातील राष्ट्रीयीकृत, सहकारी, खासगी बॅँकेबाहेर पैसे काढणे व भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभ्या असलेल्या सर्वसामान्य नागरिक, महिलांना शिवसेना व भाजपाकडून मोफत पाण्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान, इंदिरानगर भागातही नगरसेवकांनी बँकेसमोर उभे असलेल्या ग्राहकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था केली. तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध करून दिल्या.केंद्र शासनाने चार दिवसांपूर्वी चलनातून ५०० व एक हजाराच्या नोटा रद्द ठरविण्यात आल्याची घोषणा केली. यामुळे गुरूवारपासून बॅँकेमध्ये पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे. ग्राहकांनी बॅँक उघडण्यापूर्वीच बॅँकेबाहेर पैसे काढणे व भरण्यासाठी लांबलचक रांग लावल्याने बॅँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडला आहे. यामुळे ग्राहकांना बॅँकेबाहेर तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन शनिवारी दुपारपासून शिवसेना व भाजपाच्या वतीने बॅँकेबाहेर दुपारपासून शिवसेना व भाजपाच्या वतीने बॅँकेबाहेर उभ्या असलेल्या नागरिक, महिला, युवक-युवती आदिंना मोफत पाण्याचे वाटप करण्यात येत होते. शिवसेनेच्या शाखांकडून आपापल्या भागातील राष्ट्रीयीकृत व खासगी बॅँकेच्या ठिकाणी मदत केली जात होती. भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहनांमधून पाण्याच्या बाटल्या, पाऊच घेऊन ठिकठिकाणच्या बॅँकेबाहेर उभ्या असलेल्या नागरिक, महिलांना पाण्याचे वाटप करत होते. दुर्गा उद्यान समोरील स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेबाहेर शिवसेनेकडून नागरिक व महिलांना खात्यातून पैसे काढतांना भरून द्यावयाचा अर्ज मोफत भरून देत होते. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांनी साधली लोकसेवेची संधी
By admin | Updated: November 13, 2016 00:16 IST