शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धांची पुरातन मूर्ती पाहण्याची संधी

By admin | Updated: May 10, 2017 00:42 IST

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात असलेल्या वस्तुसंग्रहालयात शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली गौतम बुद्धांची मूर्ती बघण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात असलेल्या वस्तुसंग्रहालयात शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली गौतम बुद्धांची मूर्ती बघण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे.बुधवारी (दि.१०) बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालयात दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत ही मूर्ती सगळ्यांना पाहता येईल, अशी माहिती सावानाचे वस्तुसंग्रहालय सचिव देवदत्त जोशी यांनी दिली. वस्तुसंग्रहालयात असलेली ही गौतम बुद्धांची मूर्ती नेपाळ नरेश यांनी साताऱ्याचे राजे भोसले यांना भेट दिली होती. सातारा घराण्याच्या महाराणी कल्पनाराजे भोसले यांनी त्यांची मुलगी मनीषाराजे आणि जावई धनंजय पाटील यांना ही पुरातन बुद्ध मूर्ती भेट दिली होती. नाशिकचे वास्तुविशारद शिवाजीराव पाटील यांचा मुलगा धनंजय पाटील यांनी सावानाच्या वास्तुसंग्र्रहालयास ही मूर्ती भेट दिली आहे.बुधवारी (दि. १0) सकाळी साडेदहा वाजता महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते या मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे.सार्वजनिक वाचनालयातील वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन फेब्रुवारी २००४ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वस्तुसंग्रहालयात अत्यंत दुर्मीळ आणि पुरातन वस्तू असून बाबासाहेब वैशंपायन, दिवंगत बापूसाहेब काळे, ज्येष्ठारामभाई बटाविया, लक्ष्मीकांत वर्मा, सुरेश जोशी (अहमदनगर), दिलीप पणसेकर, श्रीकृष्ण धामणकर, सुधीर शिंगणे, ललिता बापट (मुंबई) यांच्या कुटुंबीयांतर्फे सावानाच्या वस्तुसंग्रहालयासाठी विविध आणि अनमोल वस्तू देण्यात आल्या आहेत. या वस्तुसंग्रहालयात असलेल्या दीड हजाराहून अधिक मूर्ती बघण्यासाठी नागरिकांनी वस्तुसंग्रहालयाला भेट देण्याचे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.