शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिवकालीन शस्त्रे जाणून घेण्याची संधी

By admin | Updated: March 10, 2017 00:50 IST

सिन्नर : छत्रपती शिवाजी महाराज यांना समजावून घ्या. त्यांचा अभ्यास करा. शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून प्रेरणा घ्या, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांनी केले.

 सिन्नर : महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना समजावून घ्या. त्यांचा अभ्यास करा. शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून प्रेरणा घ्या, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांनी केले. सिन्नर सार्वजनिक वाचनालयात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून शिवजयंती महोत्सवानिमित्त शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रकाश वाजे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष किरण डगळे, पुंजाभाऊ सांगळे, मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, पालिकेतील शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, इतिहास संशोधक गिरीश जाधव, अ‍ॅड. शिवाजी देशमुख, नारायण वाजे, मंगला शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.वाजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळविण्यासाठी घेतलेले कष्ट, त्यामागची तपश्चर्या याचा इतिहास सांगताना समाजात वावरताना छत्रपतींच्या आचार-विचारांचा आदर्श ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, नगराध्यक्ष किरण डगळे यांनी मनोगत व्यक्त केले. शिव इतिहास संशोधक गिरीश जाधव यांनी प्रदर्शनात मांडलेल्या शिवकालीन शस्त्रांची माहिती दिली. गुरुवार (दि. ९ मार्च ) ते रविवार (दि. १२) पर्यंत सिन्नर सार्वजनिक वाचनालयात शस्त्र प्रदर्शन सिन्नरकरांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या शिवकालीन शस्त्रांची ओळख सिन्नरकरांना व्हावी, शस्त्रांच्या माध्यमातून त्यावेळचा इतिहास उलगडला जावा याकरिता आमदार वाजे यांच्या संकल्पनेतून सदर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात २०० हून अधिक शस्त्रे मांडण्यात आली आहेत. यात मराठा, मुघल, राजपूत तलवार, मराठा धोप, पट्टा, समशेर खंडा, पदकुंत, अश्वकंत, गजकुंत आदि प्रकारातील भाले, मराठा कट्यार, चामड्याच्या कातडीपासून तयार केलेल्या ढाली, शमशेर, पोलादी भाला, तोफ, गोळे, मुठींंचे विविध प्रकार, वेगवेगळ्या प्रकारची वाघनखे आदि शस्त्रे मांडण्यात आली आहे. यावेळी उपनराध्यक्ष प्रमोद चोथवे, पंकज मोरे, विजय जाधव, शैलेश नाईक, गीता वरंदळ, सुजाता तेलंग, सोमनाथ पावसे, ज्योती वामने, प्रतिभा नरोटे, संग्राम कातकाडे, सदस्य सुमन बर्डे, भगवान पथवे, सुनील चकोर, जितेंद्र जगताप, मु. शं. गोळेसर उपस्थित होते. (वार्ताहर)