शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

२६ जुलैपासून अर्जातील भाग एक भरण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:56 IST

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. २६ जुलैपासून विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशाचा भाग १ भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. २६ जुलैपासून विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशाचा भाग १ भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून (दि. १५) सुरू होणार होती. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन झाल्याने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नाशिक महापालिका क्षेत्रासह पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्र, मुंबई महानगर क्षेत्रात आॅनलाइन केंद्रभूत पद्धतीने अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होईल, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-२ अर्थात महाविद्यालयाचे पर्याय (पसंतीक्रम) निवडीसाठी अर्जाचा भाग भरता येणार आहे. परंतु, त्यापूर्वी उच्च माध्यमिक विद्यालये तथा कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळावर आॅनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून, त्यासाठी बुधवारपर्यंत (दि.२२) मुदत देण्यात आली आहे. तर उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून आॅनलाइन प्रमाणित करण्याची प्रक्रिया २४ जुलैपर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फ त राबविली जाणार आहे.---------------दहावीच्या निकालानंतर भाग दोनअकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याच्या प्रक्रियेला २६ जुलैपासून सुरुवात होणार आहे. यात विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपाची माहिती भरण्यासह मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि शाळा मुख्याध्यापकांकडून अर्ज पडताळणी करून घ्यावा लागणार आहे, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा निवडीसाठी आवश्यक भाग दोन भरता येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक