शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना झुगारून नवोदितांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:04 IST

जिल्ह्यात कळवण, सटाणा, चांदवड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील काही ग्रामपंचायतीत मतदारांनी प्रस्थापिताना झुगारत नवोदिताना संधी दिली, तर काही ठिकाणी विद्यमानांच्याच हाती पुन्हा सत्तेची चावी दिली. कळवण तालुक्यात सरपंचासह सदस्यपदावर नवोदिताना संधी मिळाली.

नाशिक : जिल्ह्यात कळवण, सटाणा, चांदवड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील काही ग्रामपंचायतीत मतदारांनी प्रस्थापिताना झुगारत नवोदिताना संधी दिली, तर काही ठिकाणी विद्यमानांच्याच हाती पुन्हा सत्तेची चावी दिली. कळवण तालुक्यात सरपंचासह सदस्यपदावर नवोदिताना संधी मिळाली.कळवण : तालुक्यातील देसगाव, कोसवन, खडकी, सरले दिगर व करंभेळ येथील थेट सरपंचपदाच्या निवडणुका चुरशीच्या होऊन दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढतीत देसगावच्या विद्यमान सरपंचासह खडकी, करंभेळ, सरले दिगर व कोसवन येथे नवोदितांनी बाजी मारून ग्रामपंचायतमध्ये प्रवेश केला. देसगाव, बेंदीपाडा येथे भिवराज बागुल तर करंभेळ येथे युवराज गांगुर्डे समर्थकांनी व कोसवन, खडकी व सरले दिगर येथे नवोदित सरपंच समर्थकांनी आनंदोत्सव जल्लोषात साजरा केला. पाच ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत १५ उमेदवारांनी, तर १५ जागांसाठी २९ उमेदवारांनी नशीब अजमावले. पाच ग्रामपंचायतींच्या २२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्याने पाच सरपंच व १५ जागांसाठी निवडणूक झाली होती.धक्कादायक निकालसटाणा : तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले आहेत. मतदारांनी प्रस्थापितांना झुगारून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षीय पातळीवर मुळाणे येथे कॉँग्रेसने भाजपाला धोबीपछाड दिली तर केरसाने आणि केळझर, भाक्षी सेना, भाजपाने मुसंडी मारली आहे. येथील तहसील आवारातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आज सोमवारी (दि. २८) सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. निकाल ऐकण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आवारात मोठी गर्दी केली होती. पहिला निकाल केरसाने ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीचा बाहेर आला. थेट सरपंचपदी फुलाबाई साहेबराव माळी या ५७० मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी संगीता शरद पवार, सुशीला नानाजी पवार, सीताबाई मोठाभाऊ सोनवणे यांना पराभवाची धूळ चारली. त्यांना अनुक्रमे ३२६, ३०४, १६८ अशी मते मिळाली. मुळाणे येथील थेट सरपंचपदाच्या सामन्यात कॉँग्रेसच्या अश्विनी गरुड यांनी बाजी मारली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार मनीषा अहिरे यांचा १७१ मतांनी पराभव केला.आव्हाड, कोकाटे, साळवे विजयीसिन्नर : तालुक्यातील सोमठाणे व दापूर या दोन ग्रामपंचायतींच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयात पार पडली. अवघ्या पंधरा मिनिटात या तीन जागांचे निकाल घोषित करण्यात आले. दापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण महिला जागेवर तिरंगी लढत झाली. यात शारदा अण्णासाहेब आव्हाड (११८) यांनी संगीता नंदू काकड (१०७) व मनीषा परशराम शिंदे (८३) यांचा पराभव केला, तर ३ मतदारांनी नोटाचा वापर केला. सोमठाणे ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली. प्रभाग क्र. १ मध्ये सर्वसाधारण महिला जागेवर कमलाबाई एकनाथ साळवे (२९९) यांनी अरुणा कैलास दोडमिसे (१६०) यांचा पराभव केला. सहा जणांनी नोटाचा वापर केला. प्रभाग क्र. ३ मध्ये सर्वसाधारण जागेवर विनायक विठ्ठल कोकाटे (२८३) यांनी संजय निवृत्ती धोक्रट (२०९) यांचा पराभव केला. या प्रभागात ४ मतदारांनी नोटाचा वापर केला. तहसीलदार नितीन गवळी, नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन कर्मचाºयांनी १५ मिनिटांत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली.केळझर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत चंद्रभागा मधुकर बहिरम या विजयी झाल्या. त्यांना ७७६ मते मिळाली. त्यांनी कल्पना मोहन पवार यांना पराभूत केले. त्यांना ४१० मतांवर समाधान मानावे लागले.  यावेळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. निवडणूक निर्णय  अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार जे.पी. कुवर, नायब तहसीलदार सुधाकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत