शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर पादचारी पुुुलाचे लोकार्पण नागरिकांना पूल खुला : स्थानिकांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:11 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (माळवाडी) येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने चौपदरी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पदचारी पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (माळवाडी) येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने चौपदरी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पदचारी पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पादचारी पूल झाल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.नाशिक-पुणे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू होते. सिन्नर ते खेडपर्यंत रस्त्याचे काम गेल्या वर्षी पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने नागरिकांची व प्रवाशांची वेळेची बचत होत आहे. परंतु सिन्नर ते संगमनेर दरम्यान गावातून चारपदरी रस्ता गेल्याने अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या होत्या. स्थानिक रहिवाशांची अडचण लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने प्रायोजित योजनेतून तेथील परिस्थितीनुसार सुमारे ८८ लाख रुपये खर्च करून तीन महिन्यात पुलाचे काम पूर्ण केले आहे. सदर पुलाचा लोकार्पण सोहळा भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय आव्हाड, शांताराम पालवे, देवराम साबळे, भास्कर पालवे, महादू आव्हाड, दत्तात्रय आव्हाड, वसंत आव्हाड, पी़जी़ खोडसकर, सी़डी़ फकीर, श्रीक़े. लाल, संजय आव्हाड, शिवाजी आव्हाड, चंद्रकांत आव्हाड, एकनाथ आव्हाड, पंढरीनाथ आव्हाड, शांताराम पालवे, देवराम साबळे, भास्कर पालवे आदींसह ग्रामस्थ व राष्ट्रीय महामार्ग कर्मचारी उपस्थित होते.