शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

सायंकाळी पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:51 IST

शहरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, मंगळवार वगळता पावसाचा जोर आजपर्यंत कायम आहे. दुपारी पावणे तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. शहरातील सखल भागासह रस्त्यांवर पाणी साचले होते. महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारापर्यंत पावसाच्या पाण्याचे तळे साचल्याचे चित्र होते. सुमारे पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ शरणपूररोडवरील वाहतूक साचलेल्या पाण्यातून सुरू होती.

नाशिक : शहरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, मंगळवार वगळता पावसाचा जोर आजपर्यंत कायम आहे. दुपारी पावणे तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. शहरातील सखल भागासह रस्त्यांवर पाणी साचले होते. महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारापर्यंत पावसाच्या पाण्याचे तळे साचल्याचे चित्र होते. सुमारे पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ शरणपूररोडवरील वाहतूक साचलेल्या पाण्यातून सुरू होती.गुरुवारी (दि.१२) दुपारी पावणे तीन वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली आणि पुन्हा नाशिककरांना धडकी भरली. दिवाळीच्या खरेदीवर ‘पाणी फिरल्याची’ भावना निर्माण झाली; मात्र साडेपाच वाजेनंतर पावसाने उघडीप दिल्याने नाशिककर खरेदीसाठी बाहेर पडले होते. यामुळे संध्याकाळी रविवार कारंजा, निमाणी, पंचवटी कारंजा, अशोकस्तंभ, मेनरोड, शालिमार या भागात काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पुलाखालून तीन हजारांपेक्षा अधिक क्यूसेकने पाणी नदीपात्रात प्रवाहित होते; मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर पाण्याचे प्रमाण कमी झाले. तसेच गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रातही गुरुवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणाचा विसर्गही कमी झाला. सकाळी ६ वाजेपासून २८७४ क्यूसेकचा विसर्ग दुपारी १२ वाजता १७३२ झाला. त्यानंतर तासाभराने विसर्ग थेट ११०६ वर आला. दोन दिवसांपासून वाढलेली गोदावरीची पाण्याची पातळीही गुरुवारी दुपारी कमी झाली होती.