शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाच्या प्रलंबित १० ऑगस्टपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:10 IST

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा लांबल्या असून या लांबलेल्या परीक्षा १० ऑगस्टपासून ...

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा लांबल्या असून या लांबलेल्या परीक्षा १० ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील संभाव्य वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अंतिम परीक्षा मे-जून २०२० मध्ये होणार होत्या. परंतु कोरोना संकटामुळे या परीक्षा पुढे ढकलून ऑक्टोबर २०२० मध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. ४ नोव्हेंबरपर्यंत या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. परंतु, त्यानंतर एका महिन्याच्या कालावधीत डिसेंबर २०२० मध्ये सत्र परीक्षा घेणे शक्य नसल्याने त्या मार्चमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र मार्चमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढल्याने या परीक्षा मे २०२१ मध्ये या परीक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी नियमितपणे मे-जूनमध्ये होणाऱ्या परीक्षाही लांबणीवर पडल्या असून आता या परीक्षा १० ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. दरम्यान, यापूर्वी जुलैच्या मध्यावधीपासून परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते. मात्र जून अखेरपर्यंत परीक्षांचे नियोजन होऊ शकले नाही. त्यामुळे आता पुढील आठवड्यात परीक्षा विभागाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता असून त्यानुसार १० ऑगस्टपासून परीक्षा सुरू होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थ‌ळावर दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसार परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली आहे.