शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांच्या उघडल्या फाइल्स

By admin | Updated: January 23, 2017 00:34 IST

सतर्क : गत महापालिका निवडणुकीतील ४५ जणांवर कारवाई

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याबरोबरच सतर्क रहा, कोणाचाही दबावास न जुमानता कडक कारवाई करा, अशी तंबी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंघल यांनी रविवारी तातडीने घेतलेल्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या़ प्रशासकीय कामानिमित्त मुंबईला गेलेल्या आयुक्तांनी नाशकात परतताच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गुन्हेगारीचा आढावाही घेतला़  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून पाच दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेंद्र शेजवळ या युवकाची शुक्रवारी (दि़२०) रात्री अज्ञात चार-पाच संशयितांनी निर्घृण हत्त्या केली़ ही हत्त्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगितले जात असले तरी यातील एकाही संशयितापर्यंत पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नाहीत़ तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका इच्छुक उमेदवाराची हत्त्या झाल्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबरोबरच दहशत पसरली आहे़  पोलीस आयुक्त सिंघल हे गत दोन दिवसांपासून प्रशासकीय कामानिमित्त मुंबईला गेले होते़ सायंकाळी नाशिकमध्ये परतताच त्यांनी पोलीस उपायुक्तांसह, सहायक पोलीस आयुक्तव वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तातडीची बैठक घेतली़ या बैठकीत पोलीस ठाणेनिहाय गुन्हेगारांची माहिती घेऊन शहरातील राजकीय परिस्थितीवर बारकाईने लक्ष्य ठेवण्याच्या सूचना दिल्या़ तसेच येत्या दोन दिवसांत प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बाजावून गंभीर गुन्ह्यातील आरोपींना स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले़ महापालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे तसेच प्रस्ताव तयार करण्यात आलेल्या तडीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवून प्रस्ताव मंजूर होताच याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देत कोणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचे आदेश दिले़ या बैठकीस गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कराळे, परिमंडल एकचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, परिमंडल दोनचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, डॉ. राजू भुजबळ, सचिन गोरे, अतुल झेंडे, विजयकुमार चव्हाण यांच्यासह गोपनीय, सायबर शाखेसह शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)