शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाºयांची खोटी माहिती सभागृहात उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:44 IST

नाशिक : योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग, टेंडर प्रक्रिया, रखडलेल्या प्रशासकीय मान्यता आणि खर्चाच्या बाबतीत अधिकारी सभागृहाला देत असलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उघड झाली. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्यासमोरच अधिकारी चुकीची माहिती देत असल्याबद्दल सदस्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले.

ठळक मुद्देसंशयाच्या भोवºयात२०१६-१७चा निधी अखर्चिक

नाशिक : योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग, टेंडर प्रक्रिया, रखडलेल्या प्रशासकीय मान्यता आणि खर्चाच्या बाबतीत अधिकारी सभागृहाला देत असलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत उघड झाली. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्यासमोरच अधिकारी चुकीची माहिती देत असल्याबद्दल सदस्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची तहकूब सभा गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांचीही पहिलीच सभा असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष होते. या सभेत अधिकाºयांनी मात्र गिते यांच्यासमोर निष्क्रिय कारभाराचा नमुनाच पेश केला. सन २०१६-१७ चा निधी खर्च का झाला नाही, असा प्रश्न अधिकाºयांना विचारण्यात आल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. किती निधी अखर्चिक राहिला आणि नवीन आलेल्या निधीचा विनियोग करण्याबाबत अधिकाºयांकडून सभागृहाला देण्यात आलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचे कुंभार्डे यांनी सप्रमाण उघड केले.अंगवणवाडी बांधकामाचे ११ टेंडर अद्यापही बाकी आहेत. जे टेंडर झाले त्याचा खर्च का झाला नाही आणि इतर टेंडरप्रक्रिया पूर्ण का करण्यात आली नाही याचा खुलासा बांधकाम विभागालाही करता आला नाही. पाणीपुरवठा योजनांसाठीचा निधीचा विनियोग न करण्यात आल्याने दोन वर्षांत केवळ १९८ लक्ष रुपयेच खर्च झाल्याची बाब कुंभार्डे यांनी निदर्शनास आणून दिली.पारंपरिक ऊर्जा स्रोताच्या गेल्या दोन वर्षांपासून ९ कोटींच्या निधीचा खर्चच नाही, तर आदिवासी अािण बिगर आदिवासी भागासाठीचे सुमारे ६ कोटी पडून असल्याचेही सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तालुक्यातील कृषी अधिकारी काहीही काम करीत नसल्यामुळेच तालुक्यातून यासाठीचा एकही प्रस्ताव आला नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावेळी अशा कर्मचाºयांवर जबाबदारी निश्चित करण्याचा ठराव करण्यात आला. अतिरिक्त ठरलेल्या जिल्ह्णातील १६ शाळांचे समायोजन हे पुढील शैक्षणिक वर्षापासून केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. भारती पवार यांनी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा निधी खर्च का झाला नाही आणि विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडले गेले नसेल तर त्यावर तोडगा काढावा अशी सूचना त्यांनी मांडली. कुपोषित मुलांच्या पोषण आहारासाठंी सन २०१६-१७ मध्ये १०० लक्ष निधी प्राप्त झालेला असताना त्यापैकी केवळ ३२.५० लक्ष रुपयेच खर्च झालेला आहे. उर्वरित ६७.५० लक्ष निधी अखर्चिक राहिल्याबाबतची गंभीर बाब कुंभार्डे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. कुपोषणासारख्या विषयावर महिला बालकल्याण विभाग गंभीर नसल्याचे सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.