मुंजवाड : येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित ग्रामसभेकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने केवळ ग्रामसभेचे सोपस्कार पार पडले, तर दुसरीकडे याच दिवशी ग्रामस्वच्छता अभियान देशभर संपन्न होत असताना मुंजवाड येथे चमकोगिरी करणाऱ्यांनी छायाचित्रे काढण्यापुरते अभियान राबविण्यात आले.देशभर गांधी जयंतीच्या निमित्ताने ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेऊन गावात स्वच्छता अभियान राबविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. येथील ग्रामपंचायत कार्यालयात ११ वाजेची सभेची वेळ देण्यात आली; मात्र १२ वाजून गेले तरीही ग्रामस्थ कार्यालयाकडे न फिरकल्याने मोजकेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभा आटोपण्यात आली.
केवळ ग्रामसभेचे सोपस्कार
By admin | Updated: October 3, 2014 23:15 IST