शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भालेकर मैदानावर सात मंडळांचा एकच गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:57 IST

नाशिक : कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून, बी. डी. भालेकर मैदानावरील सात मंडळांनी एकत्र येऊन यंदा एकच गणपतीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे अन्यत्रदेखील गणेश मंडळांनी निर्णय घेतल्यास यंदा कोरोना संसर्ग टाळणे शक्य होणार आहे.

ठळक मुद्देसकारात्मक : कोरोना स्थितीमुळे निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून, बी. डी. भालेकर मैदानावरील सात मंडळांनी एकत्र येऊन यंदा एकच गणपतीची प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे अन्यत्रदेखील गणेश मंडळांनी निर्णय घेतल्यास यंदाकोरोना संसर्ग टाळणे शक्य होणार आहे.यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे उत्सव अत्यंत मर्यादित आणि औपचारिक स्वरूपात साजरा करण्याचे आवाहन शासन आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे. भालेकर मैदानावर दरवर्षी सात मंडळे वेगवेगळे गणेशोत्सव साजरा करतात. मात्र, यंदा कोरोनाचे संकट बघता मैदानावर कोणत्याही स्वरूपाचा देखावा, विद्युत रोषणाई, साउंड सिस्टीमचा वापर न करता एकाच बॅनरखाली गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे मंडळाचे पदाधिकारी गणेश बर्वे व पद्माकर गावंडे यांनी सांगितले.गणेशभक्तांचा उत्साह दरवर्षीच असतो; परंतु यंदा उत्सव साजरा करता येणार नसला तरी उत्सवाची परंपरा कायम राहावी यासाठी अत्यंत साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आणि त्या उत्सवाच्या बचत होणाऱ्या खर्चातून रक्तदान, शिबिर, सर्वरोगनिदान शिबिर, मास्क वाटप, औषधे वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्याचेदेखील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत ठरवले आहे. या बैठकीस राजे छत्रपती मंडळाचे सचिन रत्ने, महिंद्र सोनाचे राजेंद्र खैरनार, एचएएलचे हेमंत तेलंगी, महेश पगारे, नरहरी राजाचे गौरव बिरारी, मूक बधिरचे सुशांत गालफाडे, यशवंतचे कमलेश परदेशी, मायको बॉशचे संजय पाटील, महिंद्रा मंडळाचे प्रसाद शुक्ल, प्रसाद पंडित आदी उपस्थित होते. इंदिरानगरमध्ये साध्या पद्धतीने होणार गणेशोत्सवकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नासर्डी ते पाथर्डीपर्यंत सर्वांचे आकर्षण ठरणारे गणेशोत्सव उत्सव मंडळ यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करणार आहेत. भाजपप्रणीत युनिक ग्रुपतर्फे यंदा युनिक मैदानावर गणेशोत्सव साजरा न करता राजीवनगर येथील कृतार्थ भवनाच्या प्रांगणात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे संस्थापक अध्यक्ष सतीश सोनवणे यांनी सांगितले. भाजपप्रणीत श्री प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून घरगुती आरास स्पर्धा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून श्री प्रतिष्ठानच्या वतीने नियमावलीचे पालन करण्यात येणार आहे.प्रभागातील नागरिकांच्या घरगुती गणपतीच्या आरास स्पर्धा घेण्यात येणार आहे. उत्कृष्ट आराससाठी बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे, असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी सांगितले.

टॅग्स :circular roadसर्क्युलर रोडganpatiगणपती