शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या सिग्नलवरील ‘लेफ्ट टर्न’ नावापुरतेच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 21:08 IST

- अझहर शेख नाशिक, दि. 9 - सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण ...

- अझहर शेख

नाशिक, दि. 9 - सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण डावे वळण सिग्नलवरील वाहतूक कोंडी तसेच अत्यावश्यक व आपत्कालीनस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, नाशिकच्या सिग्नलवरील डावी वळणे केवळ नावापुरतीच असून ते एक देखावा ठरत असल्याचे दिसून येत आहे. प्रमुख मोठ्या सिग्नलवरील डावी वळणेदेखील खुली राहत नसल्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांपासून तर रुग्णवाहिका, अग्निशामक बंबही अडकून पडतात.शहराच्या सिग्नवरील टायमर मॅनेजमेंट टिकवून ठेवण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी टाळण्याकरिता आणि अत्यावश्यक, अपात्कालिन स्थितीत तत्काळ वाहनांना मार्ग मोकळा मिळण्यासाठी डावी वळणे खुली असणे गरजेची ठरतात. नाशिकच्या सिग्नवरील सर्वच डाव्या वळणांना जणू कायमस्वरुपी अतिक्रमणसह बेशिस्त चालक आणि वाहतूक नियंत्रण शाखेसह महापालिका प्रशासनाच्या उदासिनतेचे ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे. कारण सिग्नल ‘लाल’ झाल्यानंतर वाहने थांबण्यास सुरूवात होते. कुठे ५५ तर कुठे ६५ तर कुठे ८५ तर कुठे ९२ सेकंदापर्यंत सिग्नल ‘लाल’ असतो. वाहतुक नियंत्रणासाठी ते आवश्यकही आहे. अशावेळी वाहनांची रांग लागते ही रांग टाळण्यासाठी डावी वळणे खुली राहणे गरजेचे आहे.

जिल्हा रुग्णालयाची वाट व्हावी सुकर.... शहरातील प्रमुख सिग्नल ज्यांचा थेट संबंध जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेशी येतो त्या सिग्नलवर तरी किमान डावी वळणे खुली राहतील यासाठी शहर वाहतूक शाखा, महापालिका प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी सिग्नल, त्र्यंबक रोडवरील वन कार्यालयाचा सिग्नल, तरण तलाव सिग्नल, सिडको मार्गावरील उंटवाडी सिग्नल, जेहान सिग्नल, सीबीएस सिग्नल, त्र्यंबकनाका हॉली क्रॉस चर्च सिग्नल, गडकरी चौक सिग्नलच्या चारही डाव्या बाजूंची वळणे सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुली कशी राहतील या दृष्टीने तजवीज करण्याची मागणी होत आहे.