शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

४१५ घरांचे अवघे ८५ लाखही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

नाशिक : गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने पडझड झालेल्या ४१५ घरांच्या नुकसानभरपाईसाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. ...

नाशिक : गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने पडझड झालेल्या ४१५ घरांच्या नुकसानभरपाईसाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासनाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात घरांच्या भरपाईसाठी ८५ लाखांची मदत मागण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतरही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकलेली नाही.

गतवर्षी जूनमध्ये जिल्ह्यातून निसर्ग चक्रीवादळ जाणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता वर्तविली जात होती. परंतु पुढे सरकणाऱ्या चक्रीवादळाने दिशा बदलली आणि कोकण व नंतर मुंबईमार्गे निसर्ग चक्रीवादळ नाशिकला स्पर्शून पुढे गेले होते. या कालावधीत जिल्ह्यात जोरदार वादळी वारा आणि मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ५३० हेक्टरवरील पिकांना या वादळाचा फटका बसला होता तर ४१५ घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. घरांचे छत व पत्रे उडाले होते तर अनेक ठिकाणी भिंत खचल्या तसेच भिंतीदेखील कोसळल्याने अनेकांना रात्र उघड्यावर काढावी लागली होती.

जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण करून शासनाकडे ३०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा अहवाल पाठविला होता. त्यापैकी २२२ कोटी ९८ लाख ९१ हजारांची मदत जिल्ह्याला मिळाली. मिळालेल्या रकमेपैकी फळबागा, शेतपिके, पशुधन आदींसाठी २२२ कोटी १३ लाख ९१ हजारांची मदतीचा त्यात समावेश होता. त्यात घर पडझडीची मदत प्राप्त झाली नव्हती. शेतकऱ्यांना अजूनही मदतीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, वर्षभरानंतर का होईना या जूनमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळू शकते, अशी शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.