शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: April 22, 2016 01:41 IST

गिरीश महाजन : सिंचन शेतीकडे वळण्याचा सल्ला

नाशिक : भविष्यात पाणीप्रश्न तीव्र होत जाणार असून, मराठवाड्याच्या धरणांमध्ये तर केवळ पावणेतीन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच लातूरसारख्या मोठ्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. राज्यातील सर्व धरणांत मिळून केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.नाशिक येथे आयोजित खरीप हंगाम २०१६-१७च्या आढावा बैठकीत ते बोलत होते. समुद्रातील पाणी पिण्यासाठी गोड करून वापरण्याचा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा प्रस्ताव चांगला असला तरी तो खूप खर्चिक आहे. त्याची लगेचच अंमलबजावणी करता येणे तूर्तास अशक्य आहे. त्याऐवजी मुंबईला कोयनेतून थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा करण्याबाबत सरकारने प्रयत्न सुरू केले असून, तसा प्रस्तावही तयार करण्यात येत आहे. ही योजना अस्तित्वात आल्यास मुंबईचा पाणीप्रश्न निकाली निघून वैतरणा धरणाचे पाणी नाशिकसह मराठवाड्यासाठी उपयोगात येणार आहे. निसर्गचक्र दिवसेंदिवस अवघड होत चालले असून, शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीकडे वळले पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचनचा पर्याय खूपच चांगला आहे. त्यामुळे एकूण वापरातील ७५ टक्के पाण्याची बचत तर होतेच, मात्र उत्पादनही चांगले येते. पीक विम्याचे निकष बदलल्यामुळे आता शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविण्यासाठी उत्साह दाखविला आहे.(प्रतिनिधी)