शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

जिल्ह्यात केवळ १४०० शेतकऱ्यांच्याच मका पिकाला मिळाला हमीभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:41 IST

केंद्र शासनाने मक्याला १८५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असला, तरी खुल्या बाजारात एकाही व्यापाऱ्याकडून हमीभावाने मका खरेदी ...

केंद्र शासनाने मक्याला १८५० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असला, तरी खुल्या बाजारात एकाही व्यापाऱ्याकडून हमीभावाने मका खरेदी केली जात नाही. यासाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने हमीभावाने मका खरेदी करण्यात येत असून, यासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय एकूण ९ केंद्र सुरू करण्यात आली आहेत. केंद्र सुरू झाल्यानंतर २ नोव्हेंबरपासून आतापर्यंत एकूण ९०९९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी फक्त ३९८१ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर माल आणण्याचे एसएमएस पाठविण्यात आले असून, आतापर्यंत १४६७ शेतकऱ्यांचा ५९ हजार ३९७ क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे. खरेेदी केलेल्या मालापैकी केवळ ५२९ शेतकऱ्यांना पेमेंट अदा करण्यात आले आहे.

चौकट -

सरकारी काम सहा महिने थांब

खरेदी केंद्रांचा कारभार पहाता ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब ’ चा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. केंद्रांवर शेतकऱ्यांना प्रथम ऑनलाइन नोंदणी करून केंद्राकडून येणाऱ्या एसएमएसची वाट पहावी लागते. एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांना आपला माल केंद्रावर घेऊन जावा लागतो. त्यानंतर पेमेंट खात्यावर वर्ग होण्याची वाट पहावी लागते. याउलट खुल्या बाजारात थेट विक्री होऊन लगेचच पैसे मिळत असल्याने खुल्या बाजाराला पसंती दिली जात असल्याचे दिसून येते.

चोकट -

फक्त दोन शेतकऱ्यांना मिळाली ज्वारीची रक्कम

ज्वारीला २६२० रुपये प्रति क्विंटल भाव दिला जात असला तरी जिल्ह्यातील केवळ ८९ ज्वारी उत्पादकांनी खरेदी केंद्रांवर नोंदणी केली असून, त्यापैकी ६४ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. पैकी फक्त ४२ शेतकऱ्यांची ९८३ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली असून, आतापर्यंत देवळा तालुक्यातील २ शेतकऱ्यांना ज्वारी विक्रीची रक्कम अदा करण्यात आली आहे.