शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ऑनलाइन सत्संग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:10 PM

ओझरटाऊनशिप : कोजागिरी पैर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्र लक्ष्मी मातेचे पूजन होत आहे.त्याप्रमाणेच आपल्या घरातील लक्ष्मी स्वरूप असलेल्या आई,पत्नीचा सन्मान करण्याचा संकल्प करा. ''अधोगर डोक्यावर पदर,पतीच्या सेवेला सादर,भुकेल्याची कदर तीच खरी भारतीय मदर'' महिलांनी आपल्या सासूचा सन्मान करतांना आपल्या पतीला देव मानून सेवा करावी,मुलांना चांगले संस्कार द्यावे असा धर्मउपदेश अध्यात्म शिरोमणी समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केला.

ठळक मुद्देसमर्थ सदगुरू शांतिगिरी महाराज : घरातील लक्ष्मीचाही सन्मान करा

ओझरटाऊनशिप : कोजागिरी पैर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्र लक्ष्मी मातेचे पूजन होत आहे.त्याप्रमाणेच आपल्या घरातील लक्ष्मी स्वरूप असलेल्या आई,पत्नीचा सन्मान करण्याचा संकल्प करा. ''अधोगर डोक्यावर पदर,पतीच्या सेवेला सादर,भुकेल्याची कदर तीच खरी भारतीय मदर'' महिलांनी आपल्या सासूचा सन्मान करतांना आपल्या पतीला देव मानून सेवा करावी,मुलांना चांगले संस्कार द्यावे असा धर्मउपदेश अध्यात्म शिरोमणी समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केला.जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने ओझर येथील निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी महाराज आश्रमात कोरोनामूळे यंदा काही मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आणि ऑनलाइन पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना अध्यात्म शिरोमणी समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कोजागिरी पौर्णिमेची माहिती दिली. यादिवशीच्या जागरणाचे महत्व भाविकांना सांगितले.मनुष्य जन्म लाभला हे अपणा सर्वांचे सर्वात मोठे भाग्य आहे.हा दुर्लभ जन्म सत्कारणी लावा.''कर्म तैसे फळ'' हे गीतेचे वचन असल्याने कर्म करतांना चांगले करा.आपण ''जन्म'' गावा कडून ''मृत्यू'' गावा कडे जात आहोत हे सैदैव लक्षात ठेवा. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा.हे एकच कारण मनुष्याला जन्म घेण्याचे आहे.साधूंचे रक्षण,दुष्टांचा नाश, आणि धर्माची स्थापना या तीन कारणांसाठी देवाचा अवतार होतो.आणि वाढावया सुख,भक्ती,भाव,धर्म कुळाचार, नाम विठोबाचे या सहा कारणांसाठी संतांचा जन्म होतो. देह देवाचे मंदिर आहे.नेहमी पावित्र्यात रहा.असे सांगतानाच आपल्या घरातील आई,पत्नीस लक्ष्मी स्वरूप मानून आदर करावा.महिलांनी चूल,मूल, गाडगे,मडके इतकेच मर्यादित राहू नये.अध्यात्मिक प्रगती करावी.एक महिला संस्कारीत झाल्यास संपूर्ण कुटूंब संस्कारित होईल.असेही यावेळी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी परमपूज्य बाबाजींच्या पादुका आणि पालखीचे पूजन संपन्न झाले. सत्संग,महाआरती,नैवेद्य, दाखवून उपस्थित भाविकांना दुध ,प्रसाद वाटण्यात आला. कोरोनामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

टॅग्स :Shantigiri Maharajशांतिगिरी महाराजOzarओझर