शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती सेनेच्या वतीने ऑनलाइन मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

सायकल दुरुस्तीची वाढली कामे नाशिक : अनलॉकनंतर दुकाने सुरू झाली असून, सध्या लहान मुलांच्या सायकल दुरुस्तीची कामे सायकल कारागिरांकडे ...

सायकल दुरुस्तीची वाढली कामे

नाशिक : अनलॉकनंतर दुकाने सुरू झाली असून, सध्या लहान मुलांच्या सायकल दुरुस्तीची कामे सायकल कारागिरांकडे येऊ लागली आहेत. सध्या शाळा बंद असल्याने तसेच लॉकडाऊनमुळे मुलांना बाहेर पडता येत नसल्यामुळे आता अनलॉकनंतर मुलांच्या पालकांनी सायकली दुरुस्तीसाठी काढल्या आहेत. त्यामुळे कारागिरांच्या हाताला काम मिळाले आहे.

बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गर्दी

नाशिक : जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ते आत पाच तारखेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांची बँकांमध्ये गर्दी होत असते. बँकांमध्ये जमा होणारी पेन्शन घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागत आहेत. सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिक बँकाच्या बाहेर उभे राहत आहेत. अशा खातेदारांसाठी बँकांनी शेड्स‌ उभारले असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

शेतीवर मजूर परतू लागले

नाशिक : कारेानामुळे गावी गेलेले मजूर आता शेतकामांवर परतू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काेरोनाच्या कालावधीत अनेक मजूर गावी गेल्याने तर काही मजूर कामावर येत नसल्याने शेतकामांचा खोळंबा झाला होता. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे गावी गेेलेले मजूर परतू लागले आहेत. त्यामुळे रखडलेली काम सुरू झाली आहेत.

कोविड सेंटरला मदतीचा ओघ

नाशिक : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे कोविड सेंटर्स ओस पडू लागली असली तरी सेवाभावी संस्था तसेच सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून कोविड सेंटर्सला मदतीचा ओघ सुरूच आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हीलचेअर, व्हेंटिलेटर्स अशी मदत केली जात आहे. या मदतीमुळे आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होत आहे.

मानवधन संस्थेचा वर्धापन दिन कार्यक्रम

नाशिक : मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचा वर्धापन दिन येत्या शनिवारी साजरा केला जाणार आहे. हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने साजरा केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. यानिमित्ताने विविध उपक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थापक प्रकाश कोल्हे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

रस्त्यांवरील खोदकामांमुळे अडथळा

नाशिक : शहरातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठांच्या मार्गावर खोदकाम करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले काम संथ गतीने सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेषत: मुंदडा मार्केट, दहीपूल, नेहरू चौक भागातील रस्त्यांवरील खोदकामामुळे वाहतूक कोंडी होत आहे.