शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

मनपाच्या शाळेतही ऑनलाइन शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:18 IST

नाशिक : सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे शाळांना सुट्या आहेत. मात्र, त्यानंतरही जवळपास सर्वच खासगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे शिक्षण देत आहेत.

नाशिक : सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे शाळांना सुट्या आहेत. मात्र, त्यानंतरही जवळपास सर्वच खासगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे शिक्षण देत आहेत. मात्र, महापालिकेच्या आनंदवली येथील शाळेतील शिक्षिका सविता बोरसे पाचवीच्या मुलांचा नियमित अभ्यास आणि नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचा सरावही आॅनलाइनच करून घेत आहेत. अनेक शिक्षक अशाप्रकारचे प्रयोग करण्यासाठी प्रयत्न तर करीत आहेतच, परंतु शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक मनपा शाळांनी आॅनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.नाशिक महापालिकेच्या ९० शाळा आहेत. त्यात सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. ही संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून ई-लर्निंगसह अनेक साधनांचा वापर केला जात आहे. बाभळेवाडी शाळा पॅटर्न राबवण्यासाठी मध्यंतरी चाळीस शिक्षक प्रत्यक्ष अनुभव घेऊन आल्यानंतर त्यांनीदेखील प्रयोगशीलता दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यातच सध्या लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे मनपाच्या सर्व शाळा बंद आहेत. खासगी शाळा बंद असल्या तरी मोबाइल आणि विविध लिंक्सद्वारे शिक्षण दिले जात आहे. तसे महापालिकेत देण्याचे प्रयत्न होत आहेत. आनंदवलीतील शिक्षिका सविता बोरसे यांनी पाचवीतील सव्वाशे मुलांचा अभ्यास बुडू नये यासाठी पालकांचा मोबाइल क्रमांक घेऊन व्हॉट्सअ‍ॅप गु्रप तयार केले आहेत. त्यावर प्रश्नावली टाकून मुलांकडून ती भरून घेतली जात आहे. त्यामुळे मुलांचा अभ्यास सुट्टीतही सुरूच आहे. मुलांना नियमित प्रश्नावली पाठविल्यानंतर त्यांना काही शंका असल्यास त्याचेही निरसन केले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक